स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . ९ / २ /२०२४ ) :
इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट या शिक्षण संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची १२६ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे यांच्या हस्ते त्यागमूर्ती माता रमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार, तथागत गौतम बुद्ध मूर्तीस व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या (तात्या) प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थीनींनी रमाईंच्या जीवनावर आधारीत मंजुळ आवाजात गीतं गायली.
तसेच मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी मनोगतातून माता रमाईंचा जीवनपट मांडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
या प्रसंगी प्राचार्या अनिता साळवे, सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.