स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . ९ / २ / २०२४
गुरुवार दि.८/०२/२०२४ रोजी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सोलापूर जिल्हात माढा तालुक्यामध्ये एकाच दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन करत १४ शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाखेतील प्रत्येक गावातील लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. माढा तालुका शाखा उद्घाटन दौऱ्यावर जात असताना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संजय(भैय्या)सोनवणे यांचे ठिक ठिकाणी गाड्यांचा ताफा थांबवून हार,पुष्पगुच्छ व फेटे बांधून तर काही ठिकाणी घोड्यावरती बसवून वाजत गाजत जंगी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. तर काही ठिकाणी हलग्यांच्या कडकडाट आवाजात व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमचे प्रतिनिधी बोलताना म्हणाले महाराष्ट्र रिपब्लीकन पक्ष गोरगरीब व दलीत मागासवर्गीय समाजातील घटकांच्या उन्नती साठी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्या करीता प्रामाणिक पणे काम करत असून त्यामुळेच मोठ्या प्रमाणात आम्हाला जनतेतून प्रतिसाद मिळत आहे .
यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे पुरुष व महिला पदाधिकारी सोबत होते.