स्टार केबी न्यज

काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . १० / २ / २०२३ ) :

हर्षवर्धन पाटील यांचे बोरी गावामध्ये शनिवारी दिवसभर भाजपच्या गाव चलो अभियानांतर्गत विविध कार्यक्रम
– हर्षवर्धन पाटील बोरी गावामध्ये एक दिवस मुक्कामी

सीतारामन यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी देशव्यापी ‘गाव चलो अभियान’ सुरु आहे. पंतप्रधान मोदीजींची गॅरंटी काय आहे, हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकारच्या विविध योजना, कामगिरीची माहिती गावातील जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे, असे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

हर्षवर्धन पाटील यांचे बोरी गावामध्ये गाव चलो अभियानासाठी शनिवारी सकाळी ११:३० वा. श्रीराम मंदीर येथे आगमन होईल. त्यानंतर गावामध्ये ठिकठिकाणी चर्मकार समाज, मुस्लिम समाज, लोहार समाज, मारवाडी, कुंचीकोरवे समाज (केरसुनी व्यवसाय), वडार समाज आदी विविध समाजातील व्यवसायकांबरोबर चर्चा व त्यांच्या समस्या हर्षवर्धन पाटील ऐकून घेतील. तसेच शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन द्राक्ष बाग शेती, पॉलिहाऊस यांची पाहणी करतील व त्यांच्या अडचणीत जाणून घेतील. तसेच समाजातील जेष्ठ नागरीकांची बैठक घेतील. त्यानंतर हर्षवर्धन पाटील सायंकाळी ७ वा. खंडोबा मंदिर येथे आरती करतील व तेथे ग्रामस्थांची बैठक होईल. त्यानंतर गावात घोंगडी विणकर व्यवसायिकांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा करतील. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचा मुक्काम वैभव देवडे यांचे घरी राहील.

या अभियानाच्या दुसरे दिवशी रविवारी (दि.१२) सकाळी हर्षवर्धन पाटील हे विविध कार्यकर्त्यांच्या घरी नाष्टा चहापान करतील. हर्षवर्धन पाटील यांच्या बोरी गावातील गाव चलो अभियानात इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.