स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ३ / ७ / २० २३) :
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालय कनिष्ठ विभागातील इयत्ता बारावी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांना गुलाब फुल देऊन त्यांचा सन्मान केला.
सर्व विद्यार्थ्यांनी जिद्दीने प्रयत्नपूर्वक अभ्यास करून चांगले यश संपादन करावे हीच गुरुपौर्णिमानिमित्त अपेक्षा व्यक्त करतो असे मत यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रा. चांगदेव जाधव तसेच रिया पाडूळे , विक्रम माने या विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वरी मखरे या विद्यार्थिनींने केले. सूत्रसंचालन विकासराज होनराव यांनी केले.
प्रा. सुवर्णा जाधव, प्रा.अमित दुबे , प्रा. संतोष पानसरे , प्रा. रवींद्र साबळे , प्रा. कल्याणी देवकर , प्रा. सागर गुजराती प्रा.हर्षवर्धन सरडे यावेळी उपस्थित होते.
प्रा. भारत शेंडे यांनी आभार मानले.
