—————————————–
स्तर केबी न्यूज
संपादक : काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ७ / ७ / २०२३ ) :
जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा 338 वा पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूरहुन देहूकडे परतीच्या प्रवासात सोलापूर जिल्ह्यातून नीरा नदी ओलांडून बुधवार (दि.5) वडापूरी ता.इंदापूर येथे थोरात वस्ती यांच्या येथील मुक्काम उरकून दि. ६ जुलै रोजी सकाळी ८ वा. इंदापूर येथील श्रीराम चौकात येऊन पंढरीतील काला उरकून जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी देहूकडे परतीच्या प्रवास करत वडापूरी येथे श्री. निवृत्ती थोरात यांच्या घरी तृतीयेला मुक्काम करून चतुर्थीच्या दिवशी इंदापूर येथे सकाळी श्रीराम चौकात येऊन त्या ठिकाणी थांबला यावेळी जेष्ठ नागरीक संघाचे दत्तात्रय गुजर सर, भरतशेठ शहा , प्रा .कृष्णा ताटे , पोपट पवार , मोहन भोसले , रामभाऊ ढोकरे , रमेश पवार , शकिल मोमीन , चागदेव मोरे , भरत घाडगे , निखील सुर्वे , सुहास राऊत , देविदास पांढरे , प्रभादरणी , परमार भाभी , यांनी पालखीचे स्वागत केले तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने पालखीतील जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले व त्या ठिकाणी पालखी बरोबरील विश्वस्त व वारकऱ्यांना अल्पोपहार व फराळ विविध सामाजीक संघटनेन कडून देण्यात आला . पालखी दिवसाला ३५ते ४० कि .मी. पायी प्रवास करत
पालखी सोहळ्यासोबत देहू संस्थानचे माजी अध्यक्ष ह. भ. प. बापूसाहेब महाराज मोरे देहूकर, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे, पालखी सोहळाप्रमुख भानदास मोरे, धनंजय मोरे, दीपक मोरे, माणिक मोरे, राम मोरे आहेत. पालखी सोहळा लासुर्णे (दि. 6), बर्हाणपूर (दि. 7), हिंगणीवाडा (दि. 8), वरवंड (दि. 9), उरुळी कांचन, (दि. 10), नवी पेठ-पुणे (दि. 11), पिंपरी गाव (दि. 12) याप्रमाणे मुक्काम करून
दिवसाला ३५ते ४० कि .मी. प्रवास करत
श्री क्षेत्र देहूला पालखी सोहळा गुरुवार दि.14 जुलै रोजी पोहचणार आहे.
परतीच्या पालखी सोहळ्यास वाढता प्रतिसाद!
पूर्वी परतीच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी अत्यल्प असतात व प्रवासात नागरिकांचाही फारसा प्रतिसाद मिळत नसे. मात्र, अलीकडच्या काळात परतीच्या प्रवासामध्ये वारकर्यांची संख्या वाढली आहे. प्रवासादरम्यान नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती संत देहू संस्थानचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब महाराज मोरे देहूकर यांनी दिली.
