स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि.11 जून ) :

इंदापूर तालुक्यामध्ये रस्त्यांच्या कामांमध्ये शेकडो कोटी रुपयांच्या झालेल्या भ्रष्टाचाराची तसेच दर्जाहीन कामांची चौकशी होणार असल्यामुळे, आपले बिंग फुटेल या भीतीमुळे आमदारांची मनस्थिती ढसाळल्याचे रविवारी तालुक्यातील एका कार्यक्रमांमध्ये दिसून आले. पायाखालची वाळू सरकू लागलेल्या आमदारांनी बेताल वक्तव्ये थांबावीत अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्रचे सरचिटणीस गजानन वाकसे यांनी रविवारी दिला.
राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे सणसरला शुक्रवारी दि.9 पालखी पाहणी दौऱ्यावरती आले असता अनेक पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ यांनी इंदापूर तालुक्यात रस्त्यांच्या झालेल्या निष्कृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी व्हावी, यासंदर्भातील अनेक निवेदने मंत्र्यांना दिली आहेत. विविध रस्त्यांच्या कामाची लवकरच चौकशी होऊन त्यातून टक्केवारी उघड होणार आहे. तसेच तालुक्यातील गैरकामकाजाची केंद्रीय जलशक्त मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याने आमदारांचे अनेक कारनामे उघड होणार असल्याने ते चिंतेत आहेत. त्यातून ते बेताल वक्तव्ये करीत असल्याचे वाकसे यांनी सांगितले.
रस्ते आणि जलजीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी योजनेसाठी आलेला पैसा हा जनतेचा पैसा आहे. त्यामुळे या पैशाचा विनयोग हा योग्य असाच झाला पाहिजे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या दोन-तीन वर्षात या कामांमध्ये घेतलेल्या टक्केवारीची जोरदार चर्चा जनतेमध्ये चालू आहे. त्यामुळे रस्ते व हर घर हर जल योजनांच्या चौकशीचा निर्णय योग्य असल्याचे गजानन वाकसे यांनी नमूद केले.
दरम्यान, रस्ते व हर घर जल योजनेच्या कामांची चौकशी सुरू होणार असल्यामुळे तालुक्याच्या जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधणे साठी आमदार हे भाजपच्या कारखान्यांवर दिशाभूल करणारे बेताल आरोप करीत आहेत. मात्र आमदार हे स्वतः छत्रपती कारखान्याचे चेअरमन असताना त्यांनी काय काय दिवे लावले? हे छत्रपती कारखान्याच्या शेतकऱ्यांना माहित आहे. त्यामुळे आमदारांनी दिशाभूल करणारे आरोप करू नयेत अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्रचे सरचिटणीस गजानन वाकसे यांनी दिला आहे.
_________________________
