स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. १० / ७ / २०२३ ::
अनिल पवार आणि तानाजीराव धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहर बंदचा इशारा
बारामती तालुक्यातील वडार समाज मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार
– = – – – – –

मौजे.रेडा (ता. इंदापूर) येथील वडार समाजातील लोकांनवर स्वतःची मालकी हक्काची जमीन असुन ती जमीन कसण्यासाठी स्व:ताच्या मालकी हक्काचा रस्ता ठेवला होता.त्या रस्त्याची ग्रामपंचायत,तलाठी कार्यालय,गट नकाशा,सेर्व्हे नंबर नकाशा कुठेही नोंद नाही.पवार कुटुंबाच्या जमीन शेजारी माने कुटुंब जमीन असून त्यांची जमीनीच्या गटातील, सेर्व्हे नंबरच्या नकाशात इंग्रज राजवटीपासूनचा नोंद असणार पुर्व दिशेला रस्ता असताना, पुर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अनेक पर्याय असताना विनाकारण पवार कुटुंबारती खोट्या अॅट्रासिटी खोटे गुन्हे दाखल करणे विविध शासकीय खोटी निवेदन व तक्रारी अंदोलन करू नहाक त्रासन देणे प्रकार चालू आहेत.
तसेच खाजगी मालकीचे शेतातील शेतरस्त्या मधील अडथळ्याबाबत लगतचे माने कुटूंबानी मा. तहसिलदार, इंदापूर यांचेकडे केस दाखल केलेली होती. त्याचा निर्णय दि. २७/३/२०२३ रोजी झालेला असून त्या निर्णयाविरुध्द सदरचे माने कुटूंबातील सर्वांनी मा. प्रांतअधिकारी यांचे कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी सदर प्रांत अधिकारी यांनी त्यांना कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना बेकायदेशीरपणे पोलीस बंदोबस्त देण्याचा आदेश केलेला होता. त्या आदेशाप्रमाणे बारामती येथील डि.वाय.एस.पी. यांनी त्यांचे उपस्थितीत १०० ते १२५ पोलीसांचा फौजफाटा घेऊन तहसिलदार यांचे उपस्थितीत पवार कुटूंबियांना गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन पवार कुटूंबियांचे मालकीच्या खाजगी रस्त्यावर बेकायदेशीरपणे मुरमीकरण व खडीकरणाचे काम केलेले आहे.
वडार समाजातीललोकांनावर फार मोठा अन्याय केलेला आहे. त्याबाबत अन्यायग्रस्त वडार समाजातील लोक हे त्यांना न्याय मिळावा म्हणून मा. प्रांतअधिकारी यांचेकडे विनंती केलेली आहे. त्याबाबतीत त्यांनी दि.७/०६/२०२३ रोजी त्यांना लेखी पत्र दिलेले आहे.सदरच्या पत्राप्रमाणे दोन दिवसात त्यांना न्याय न मिळाल्यास ते बारामती येथील प्रांत कार्यालयासमोर सामुदायीक आत्मदहन करणार आहे म्हणून त्यांना कळविले आहे.
*महाराष्ट्रातून वडार समाजातील महिला पुरुषासह विविध संघटना बारामतीत कार्यालयवर धडकणार*
वरील वडार समाजातील लोकांवर अन्याय झाल्याने त्यांना न्याय न मिळाल्यास महाराष्ट्रातील विविध वडार समाज संघटना एकत्रितपणे आंदोलन करणार आहेत. म्हणून त्यांनी दि. ८/६/२०२३ रोजी बारामती प्रांत कार्यालय यांच्याकडे वडार पँथर बारामती येथील प्रसिद्ध प्रमुख योगेश पवार, रोहिदास धोत्रे,अनिल भटकर,लखन शिंदे,सनी धोत्रे तसेच मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष भारत युवराज पवार यांनी संघटनेमार्फत पत्र दिलेले आहे.
काही समाजातील व प्रशासनातील अधिकारी जाणून बुजून अन्याय अत्याचार करतात त्यांच्या निषेधार्थ वडार पँथर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दि.१५ जुनं २०२३ पर्यंत या कुटुंबाला न्याय नाही मिळाला तर आम्ही उपविभागीय कार्यालय बारामती येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे. तसेच इंदापूर शहर बंद करण्याचे संविधानिक पद्धतीने आंदोलन करणार आहे. याची माहिती अनिल आण्णा पवार उपाध्यक्ष वडार पँथर संघटना महाराष्ट्र राज्य , तानाजीराव धोत्रे प्रदेश सरचिटणीस भटक्या विमुक्त जाती जमाती संघटना महाराष्ट्र राज्य, दुर्गा दादा शिंदे, अविनाश चौगुले, भाऊसाहेब पवार, लखन चौगुले संतोष मखरे, एड.विजय पवार शिवराम बापू पवार, राहुल धोत्रे यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली असून त्यांची प्रशासनाने याची नोंद घ्यावी असे म्हटले आहे.
—————–
