स्टार केबी न्यूज
सपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. 15 / 6 / 2023 ) :
संत तुकाराम पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग 965 जी) श्री क्षेत्र देहू ते पंढरपूरचे काम सध्या वेगात चालू आहे. परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून संबंधित ठेकेदारावर चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
आज १४ जून रोजी माजी मंत्री पाटील व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य अंकिता पाटील- ठाकरे यांनी नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली, यावेळी इंदापूर तालुक्यातून सुरू असलेला पालखी महामार्गाचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून संबंधित ठेकेदारावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
विशेष म्हणजे बारामती ते सारखे या पालखी महामार्गाचे काम फक्त दोन कॉन्टॅक्टर करत आहेत. या दोन्ही कॉन्ट्रॅक्टरच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा सुरू असून वारकऱ्यांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अर्धवट झालेली आहेत.त्यामुळे सदर रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे असे निवेदनात म्हटले आहे.
इंदापूर तालुक्यात रस्त्याच्या बाबतीत अनेक तक्रारी समोर आल्या असून याबाबतीत नेहमीच चर्चा होत असते, परंतु पालखी महामार्गासंदर्भात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गडकरी यांची भेट घेत चौकशीची मागणी केली आहे.
