स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १० / ६ / २० २३) :

इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर च्या अध्यक्षपदी स्त्री रोग तज्ञ डाँ. कल्पना खाडे, उपाध्यक्षपदी डॉ. अनुराधा कांडलकर स्त्रीरोगतज्ञ वालचंदनगर, सचिवपदी स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्रतिभा वणवे, खजिनदारपदी डॉ. महेश रुपनवर यांची 2023-24 या वर्षासाठी बिनविरोध निवड झाली. त्यांचा पदग्रहण सोहळा दि. 9/6/2023 रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, माईल एमआयटी, पुणे च्या संचालिका डॉ. सुचित्रा कराड,अश्विनी हॉस्पिटल अकलूजचे डॉ. एम. के. इनामदार व आय एम ए इंदापूरचे पँट्रन डॉ. राम अरणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यकारणी सदस्य पुढील प्रमाणे : डॉ. माधुरी चंदनशिवे , डॉ. कोमल गार्डे, डॉ. दिपाली खबाले,डॉ. शुभांगी शिंदे, डॉ. सविता पोमणे. असोसिएशनच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्ण महिला सदस्यांची कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. नवनियुक्त सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.