स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. १० / ६ / २० २३)

: राष्ट्रवादी कॉँग्रेसचा आज २५ वा स्थापना दिवस असून या दिवशी पक्षाचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवण्याचा आज निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड आज घोषित केली.
दिल्ली येथे सुरू असलेल्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. पक्षाच्या स्थापना दिवसा निमित्त आज ते दिल्ली येथे आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे काम पाहणार आहेत असे घोषित केले. दोघांकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे; तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
काही दिवसंपूर्वी चेंबूर येथील सभेत पवारांनी पक्षाचे अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली होती. या कार्यक्रमांत मोठे नाट्य पाहायला मिळाले होते. अखेर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आलीय असे म्हटले होते. मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थित नसल्याने त्यांनी त्यावेळी निर्णय घेण्याचे टाळले होते.
