स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. ८ / ६ / २० २३) :
जिजाऊ फेंडरेशन (जिजाऊ इंदापूर तालुका महिला बचत गट असोसिएशन) ग्रामपंचायत बावडा व राजाराम आष्टेकर ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने वट पौर्णिमेचे औचित्य साधून महिलांसाठी होम मिनिस्टर कर्तुत्वान महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामाजिक श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका या सर्व कर्तृत्वान महिलांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या सदस्या व जिजाऊ फेंडरेशनच्या कार्याध्यक्षा सौ.अंकिता पाटील ठाकरे यांच्या शुभहस्ते.करण्यात आला.
यावेळेस अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या, दैनंदिन व्यस्त कामातून महिलांना एक वेगळा अनुभव व आनंद मिळावा याकरिता या कार्यक्रमाचे आपण आयोजन केले आहे.
बावडा येथे शनिवारी ३ जून २०२३ रोजी सायंकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात होमनिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या होममिनिस्टर कार्यक्रमात संगीत खुर्ची, महिलांच्या डान्स स्पर्धा पार पडल्या तसेच विविध इतर स्पर्धा देखील खेळी मेळीच्या वातावरणात पार पडल्या. या कार्यक्रमाला महिला व मुलींनी मोठी गर्दी केली होती.
