स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ८/६ / २०
२३ ) :


इंदापूर तालुक्यातील दादासाहेब पाटील विद्यालय कांदलगाव या विद्यालयाची व हिंगणगाव ता. इंदापूर येथील विद्यार्थिनी भाग्यश्री धनंजय कळमकर पाटील तिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत विद्यालयात तिसरा क्रमांक पटकावला ग्रामीण भागातील शिकवणी किंवा खाजगी क्लास नसतानाही आई-वडिलांना शेती कामात लसुन मका भोपळा भेंडी या पिकांची खुरपणी पाणी देणे नंतर तोडणी करणे यासाठी हातभार लावून मदत करत रात्री च्या वेळी अभ्यास करून तिने यशस्वीपणे
84.40% मार्क मिळवून इयत्ता दहावी मध्ये घवघवीत यश संपादन केले
शेतकरी धनंजय कळमकर पाटील यांची कन्या भाग्यश्री धनंजय पाटील हिने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी समोर एक नवीन आदर्श निर्माण करून दिला आहे तिने अभ्यासाबरोबरच सर्व गोष्टीचे वेळापत्रक बनविले होते वेळेवर उठणे व झोपणे , अभ्यास करणे ,खेळणे ,व्यायाम व शेतकाम याचा संपूर्ण अभ्यास करून नंतर शाळेचा अभ्यास पूर्ण केला त्यातून ती यशस्वी झाली.

भाग्यश्री कळमकर पाटील ही स्टार केबी न्यूजशी बोलताना म्हणाली मी शेतकरी कुटूंबातील मुलगी असून मी शेतातील , घरातील सर्व कामे आटपून कोणताही क्लास न लावता अभ्यास पूर्ण केला व दहावी मध्ये यशस्वी झाले यामध्ये मला माझी आई उर्मिला धनंजय कळमकर पाटील व माझे वडील धनंजय कळमकर पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले तसेच माझे शिक्षक आरबी जमदाडे सर मुख्याध्यापक दादासाहेब पाटील विद्यालय कांदलगाव यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यांच्यामुळे मी हे यश संपादन करु शकले असे ती म्हणाली .