स्टार केबी न्यूज
संपादक . काकासाहेब मांढरे इंदापूर दि. ३१ / ५ / २०२३ ) :

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्कृष्ट प्रशासक होत्या. समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे. महिला सक्षमीकरणाची प्रेरणा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श प्रशासकीय कामकाजातून मिळते, असे गौरवोद्गार माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.31) काढले.
मुंबई येथे राज्य भाजपच्या कार्यालयामध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राजमाता अहिल्यादेवीनी तळागाळातील उपेक्षित वर्गाला मदत करण्याचे कार्य केले. तसेच धार्मिक स्थळांच्या परिसरात मंदिरे, धर्मशाळा, नदी घाट यांची उभारणी करून समाजाच्या धार्मिक प्रगतीसाठी अधिष्ठान प्राप्त करून दिले. अनेक राज्यांमध्ये रस्त्याच्या कडेला पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी बांधलेले बारव अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी राज्याची आजही साक्ष देत आहेत, असे गौरवोद्गारही हर्षवर्धन पाटील यांनी काढले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
____________________________