स्टार केबी न्यूज
संवादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १ / ६ / २० २३) :
इंदापूर येथे आज गुरुवार दि . १ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने इंदापूर शहरवासी यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न घरपट्टीचे व्याज पाणीपट्टीचे व्याज घनकचरा घरकुल घरकुलाच्या किमती घरकुलाचे हप्ते घरकुल आवास वरील जागेवर कचरा डेपो अशा अनेक प्रश्नांवर गेली 67 दिवस धरणे आंदोलन केले आहे शासनाचे या आंदोलनाकडे लक्ष द्यावे यासाठी संघर्ष समितीने आजपर्यंत अनेक प्रकारची आंदोलने केली यामध्ये दहावा खुर्चीला पुष्पहार अशा अनेक प्रकारची आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्याचाच आज एक भाग म्हणून एक जून व दोन जून हे असंख्य लोकांचे वाढदिवस असतात आज त्यानिमित्ताने इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने 101 लोकांची आज वाढदिवस असलेल्या यादी करून त्यांचा वाढदिवस धरणेमंडपामध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला या वाढदिवसामध्ये संघर्ष समितीच्या अनेक प्रमुखांचाही वाढदिवस होता त्यामध्ये महादेव चव्हाण अशोक ननवरे संतोष जामदार बापू गायकवाड भारत बोराटे यासह अनेकांचा वाढदिवस होता हा वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना संघर्ष समितीचे जेष्ठ मार्गदर्शक हमीदभाई आत्तार , बाळासाहेब शिरसागर शिवाजीराव मखरे
कार्याध्यक्ष आर.पी.आय आठवले पुणे जिल्हा . मा . नगरसेवक शेखर पाटील . सागर गानबोटे .
रघुनाथजी खरवडे विठ्ठल नाना पवार रमेश आबा शिंदे संदिपानजी कडवळे सर
मेजर महादेव सोमवंशी अशोकराव पोळ यासह अनेकांनी मांडली याला प्रतिसाद म्हणून आज वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले यानिमित्ताने 101 नागरिकांचे वाढदिवसानिमित्त या वेळेला हजर होते या सर्व नागरिकांनी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने पिवळे फेटे बांधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज की जय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय राजमाता अहिल्यादेवी होळकर चा विजय असो महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय सावित्रीबाई फुलेंची जय तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे की जय अशा आसमात आवाज उठणाऱ्या घोषणा दिल्या इंदापूर नगरपालिकेचे प्रशासन इंदापूरकर नागरिक यांचे लक्ष वेधून घेतले आजच्या या वाढदिवस कार्यक्रमाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळालेला पाहून प्रशासन हादरले असून प्रशासनाच्या देण्यात आलेले आहे की इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या पाठीशी संपूर्ण शहर आहे कारण नसताना मुठभर लोकांचे ऐकून प्रशासनाने इंदापूरकर नागरिकांना वेठीस धरू नये त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत अशा प्रकारची अपेक्षा प्रशासकाकडून प्रशासनाकडून केली जात असल्याचे प्राध्यापक कृष्णा ताटे यांनी व्यक्त केली
