स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब माढरे इंदापूर:- (दि.३१) :

इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भिमाई आश्रमशाळेच्या अधिक्षक लता सातपुते यांच्या हस्ते सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध मूर्तीस पुष्प, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार तर संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे, अधीक्षक अनिल ओहोळ, कर्मचारी जगदीश कांबळे आदी उपस्थित होते.
