स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे
इंदापूर ( दि. २५ / ४ / २०२३ ) :

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत श्री स्वामी समर्थ प पू गुरुमाऊली व अादरणीय श्री चंद्रकांत दादा साहेब यांच्या कृपा अाशीर्वादाने व आदरणीय श्री सतीश दादा मोटे साहेब तसेच इंदापूर केंद्रातील प्रमुख सेवेकरी प्रदिप भगत यांच्या
मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका ग्रामविकास अभियान अंतर्गत तालुक्यातील कालठण नंबर १ या ठिकाणी प्रचार प्रसार सेवा व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी सोहळा संपन्न झाला. यावेळी कर्मयोगी सह साखर कारखान्याचे संचालक हनुमंत ( भाऊ) जाधव यांचे हस्ते अारती संपन्न झाली. केंद्र कालठण नं १ येथील विठ्ठल रुक्मीणी मंदीर येथे स्थापना करण्यात आले. दर रविवारी संध्याकाळी ६:३० वाजता साप्ताहिक आरतीचे नियोजन करण्यात आले.
श्री काळ भैरवनाथ मंदिरातून स्वामी समर्थाच्या पालखी ची मिरवणूक संपूर्ण गावातून भजन करत मिरवण्यात अाली. यावेळी महिलांनी दारात रांगोळ्या काढून स्वागत केले व पालखीची पुजा केली .यावेळी काकासाहेब मांढरे, उपसरपंच मधुकर क्षीरसागर माजी उपसरपंच दिनकर जगताप , अमोल कदम ,नितीन दीक्षित, राणी क्षीरसागर, प्राची चिंचकर, रामदास जगताप सर, अरविंद जगताप, भारत शिंदे सर, यांनी सहकार्य केले तसेच राजेंद्र चिंचकर, देविवास पाटिल, माजी सरपंच रविंद्र कदम, शहाजी कदम, संतोष सपकळ, तानाजी सपकळ, हरिदास शेंडगे, उत्तम सपकळ, प्रसाद पाटील, महादेव पाटिल, वसंत पाटील, अरुण कुंभार, बबलू क्षीरसागर तसेच पुरुष व महिला साधक मोठया प्रमाणात उपस्थित होते .