स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि २३ / ४ / २० २३) :

: राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले व एकेकाळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते म्हणून समजले जाणारे वसंतराव आरडे यांची संघटनात्मक गुण ओळखून शिवसेनेने त्यांना पुणे जिल्ह्याचे प्रवक्ते पदी निवड केली आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वसंतराव आरडे यांच्या अनुभवाची दखल घेऊन जिल्हाप्रमुख यांना पुणे जिल्हा प्रवक्ते पदी नेमण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज बारामती येथे जिल्हाप्रमुख सुरेंद्र देवरे यांनी वसंतराव आरडे यांना जिल्हा प्रवक्ते पदी निवड झाल्याचे पत्र दिले .वसंतराव आरडे हे गेल्या २५ वर्षापासून राजकारणात सक्रिय सहभाग. पूर्वी त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादीने त्यांची पुणे जिल्हासरचिटणीस पदी निवड केली होती,पण राष्ट्रवादीत प्रमाणीक कार्यकर्त्याला किंमत जास्त मिळत नाही,त्या ठिकाणी गद्दारांना जवळ केले जाते, ख-याला किंमत नाही, म्हणून त्यांनी राष्ट्रवादी सोडली होती. आपल्या निवडीच्या प्रक्रियेनंतर नवनियुक्त जिल्हा प्रवक्ते वसंतराव आरडे म्हणाले की,”मी येणाऱ्या काळात पुणे जिल्ह्यात शिवसेना घरोघरी पोहोचवण्याचे काम करीन व खा.राहुलजी शेवाळे मुंबई व माजी राज्यमंत्री शिवतारे बापू यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वाढवणार आहे, वसंतराव आरडे यांचा प्रदीर्घ अनुभव आणि पक्षाकडून मिळणारी साथ यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना मजबूत होणार, आसे मत वसंतराव आरडे म्हणाले. त्याच बरोबर निवड झाल्याबद्दल वसंतराव आरडे यांचा सन्मान करण्यात आला ,इंदापूर तालुका प्रमुख महारुद्र पाटील,अशोकराव घोगरे,शिवाजीराव ईजगुडे, किसनराव जावळे, किरण गोफणे, सुभाष जगताप, शशिकांत तरंगे, तुकाराम करे, दुर्वास शेवाळे,आप्पा माने,बबनराव खराडे, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते,