स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे (दि. २५ / ४ / २०२३ ) :

फोटो
निमगाव केतकी ता.इंदापूर: संतोष हिंगाणे यांचा सुवर्णयुगेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे यांनी सत्कार केला.
– – – – – – – – – – – – – – – – – – –
निमगाव केतकी गावचे संतोष अशोक हिंगाणे यांची सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वर्ग १ पुणे शहर या पदावर पदोन्नती झाली आहे.या बद्दल निमगाव केतकी येथे ग्रामस्थ व विविध संस्थांच्या वतीने श्री हिंगाणे यांचा सत्कार करण्यात आला.
सुवर्णयुग गणेश मंदिरात श्री संतोष हिंगाणे यांचा व त्यांच्या पत्नी शुभांगी यांचा सुवर्णयुगेश्वर पतसंस्था व सुवर्णयुग ट्रस्ट यांच्यावतीने ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे, उपाध्यक्ष भारत मोरे, सचिव किशोर पवार, विश्वस्त दशरथ बनकर, पतसंस्थेचे संचालक भीमराव बोराटे, उत्तम शेंडे, किरण चांदणे तसेच अंकुश भोंग यांनी सत्कार केला.
यावेळी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणी म्हणाले, हिंगाणे यांना मिळालेल्या उच्च पदाचा ग्रामस्थांना निश्चित मोठा अभिमान आहे .
केतकेश्वर पतसंस्थेत संस्थेचे अध्यक्ष गोरख आदलिंग, सुधाकर भोंग, दादा भिसे, ज्ञानदेव मोरे यांनी हिंगाणे यांचा सत्कार केला.
वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने संतोष हिंगाणे, पत्नी शुभांगी व आई सुमन यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब लोणकर, अशोक गोटे, अनंता गटकुळ, मल्लिकार्जुन हिंगाणे, दिलीप चिखले, अतुल होनराव, नितीन देवशेटे यांच्यासह समाजातील बांधव उपस्थित होते.
