स्टार केबी न्यूज

संपादक काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ४ / ४ / २०२३ ) :निमगाव केतकी येथील सुमारे २०० वर्षाची कुस्तीची परंपरा असलेल्या प्रसिद्ध चिंचेचा कुस्ती आखाड्याच्या विकासासाठी रु. २५लाखाचा निधी जिल्हा नियोजन विकास मंडळातून देण्याची घोषणा भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि. ३) केली.
चिंचेचा कुस्ती आखाड्यामध्ये श्री केतकेश्वर यात्रे निमित्त आयोजित कुस्ती आखाड्यास हर्षवर्धन पाटील यांनी भेट दिली. सदर प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, ऐतिहासिक असलेल्या चिंचेचा कुस्ती आखाड्यास यापूर्वी आपण वॉल कंपाउंडसाठी तसेच आखाडा तयार करणेसाठी वेळोवेळी निधी दिला आहे. निमगावचा चिंचेच्या कुस्ती आखाडा हा आपली सर्वांची शान आहे. त्यामुळे येथे स्टेडियम बांधणे व विकासासाठी रु. २५ लाखाचा निधी दिला जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले. सदर घोषणेचे ग्रामस्थांनी, कुस्ती शौकिनांनी स्वागत केले.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी राज्यभरातून आलेल्या उपस्थित मल्लांशी संवाद साधला. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पै.संतोष जगताप विरुद्ध पै. पृथ्वीराज मोहोळ ही लढत लावण्यात आली. यावेळी देवराज जाधव, अंकुश जाधव, लालासाहेब पवार, दशरथ डोंगरे, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, वसंत मोहोळकर, दत्तात्रय शेंडे, मच्छिंद्र चांदणे, गोरख आदलिंग, तात्यासाहेब वडापुरे, पांडुरंग हेगडे, प्रवीण डोंगरे, दादाराम शेंडे, सिकंदर मुलाणी, तुषार जाधव, आबा शिंगाडे, राहुल जाधव, अस्लम मुलाणी, सचिन चांदणे, माऊली बनकर, निवृत्ती हेगडे, समीर मोरे, गणेश शेळके, मारुती घनवट, अशोक मिसाळ, तुषार खराडे तसेच कुस्ती संघटक पैलवान रावसाहेब मगर यांचेसह राज्यभरातून आलेले मल्ल, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
______________________________
