स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २ / ४ / २०२३ ) :

फोटो ओळ – महिन्यापूर्वी पंचायत समिती गट विकास अधिकारी व बांधकामच्या अधिकाऱ्यांबरोबर रस्त्याची पाहणी करताना उपाध्यक्ष निवास शेळके.
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – –
करेवाडी ते वायरलेस या रस्त्याला जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ मध्ये मंजुरी मिळून मिळाली आहे. या रस्त्यासाठी एक कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यावर मोठाले खड्डे असल्याने परिसरातील अगोती, कळाशी, गंगावळण या गावातील नागरिकांना इंदापूरला येण्यासाठी वरकुटे बुद्रुक वरून आठ ते दहा किलोमीटर जादाचा प्रवास करून यावे लागत होते. यामध्ये नागरिकांचा जादाचा वेळ व गाडीचे इंधन वाया जात होते. रस्त्याला मंजुरी मिळाल्यामुळे परिसरातील नागरिकमी समाधान व्यक्त होत आहे.
रस्त्याच्या मंजुरीसाठी मागील दोन वर्षापासून इंदापूर काँग्रेसचे उपाध्यक्ष निवास शेळके पाठपुरावा करत होते. पंचायत समिती विकास अधिकारी तसेच बांधकाम विभाग यांच्याशी वारंवार संपर्क करून रस्त्याच्या समस्या मांडली होती. शेळके यांच्या वारंवारच्या निवेदन व प्रत्यक्ष भेटीनंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व बांधकाम विभागाचे अभियंता शिवकुमार कुपल यांनी सदर रस्त्याची स्थळ पाहणी करत लवकरात लवकर रस्ता मंजूर व्हावा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
एक महिन्यापूर्वीच्या स्थळपाहणीनंतर गटविकास अधिकारी यांच्या अहवालानुसार रस्ता मंजूर झाल्याने परिसरातील नागरिकांनी सदर रस्त्याच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करत असणारे इंदापूर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष निवास शेळके यांचे आभार मानले. यावेळी नागरिकांनी रस्त्याचे काम लवकरात लवकर आणि दर्जेदार करून घेण्याची मागणी निवास शेळके यांच्याकडे केली.
फोटो ओळ – महिन्यापूर्वी पंचायत समिती गट विकास अधिकारी व बांधकामच्या अधिकाऱ्यांबरोबर रस्त्याची पाहणी करताना उपाध्यक्ष निवास शेळके.
