देह हा नाशवंत आहे तो योग्य वेळीच सत कर्मी लावावा : ह भ . प . गायनाचार्य गितांजली महाराज अभंग – भुजबळ

कै . श्रीमती भारती एकनाथ गारदी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमीत्त इंदापूर येथे सोमवार दि . ३ एप्रील रोजी सकाळी १० ते १२ या कालावधीत ” क्षणोक्षणी हाची करावा विचार । तरावया भार भवसिधू ॥

नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥ या जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावरती सुश्राव्य प्रबोधन पर गायनाचार्या ह.भ प . गितांजली महाराज अभंग -भुजबळ यांनी किर्तन केले त्यावेळी त्यांनी वरील विचार मांडले

हे किर्तन कालठण नं. २ रोड इदापूर या ठिकाणी पार पडले यावेळी शी . एकनाथ गारदी साहेब परिवार यांच्या कुठूंबा बद्दल स्नेह व आपुलकी असणारे आप्तेष्ठ राजकीय सामाजीक क्षेत्रतील कार्यकर्ते अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते .

किर्तन साथ करण्याकरीता आळंदी येथील जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्थेतील ह .भ . प . त्र्यंबक महाराज शिंदे गायन साथ तर पखवाज साथ ओम महाराज , विकास महाराज खिल्लारी , दत्ता महाराज तनपुरे यांनी तसेच श्री हरीहरी वारकरी शिक्षण संस्था कोर्टी ता . करमाळा या संस्थेचे प्रमुख ह . भ. प . विजय महाराज अभंग मच्छिंद्र महाराज अभंग यांनी गायन किर्तन साथ व पखवाज साथ ह.भ.प . माऊली महाराज मेढे यांनी व त्यांचे व संस्थेचे विद्यार्थी व पंचक्रोशीतील भजनी मंडळी यांनी केली यावेळी महिला श्रोता वर्ग मोठ्या प्रमाणात होता .

किर्तनानंतर ठिक १२ वाजता प्रतिमेवरती पुष्पांजली करण्यात आली त्यांनंतर आरती व भोजन पार पडले .
आलेल्या सर्व भजनी व महाराजांचा सत्कार गारदी परिवारातर्फे करण्यात आला .
