स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर :
स .इ . ब्रम्हचैतन्य परिवार एम . एस . इ .बी . इंदापूर कालठण नं . २ रोड संस्थापक कै . शामराव हनुमंतराव व श्रीमती सुखदा शामराव नसरापूरकर यांचे वतीने गेली १९ वर्षापासून विविध धार्मीक कार्यक्रमा बरोबरच रामजन्मोत्सव मोठ्या पारंपारीक पद्धतीने साजरा करण्यात येत असतो यावर्षी देखील संस्थेच्या कार्यालयात महिलां भाविकांच्या उपस्थीतीत साजरा करण्यात आला .
यामध्ये सकाळी प्रथम संस्थापिका श्रीमती सुखदा नसरापूरकर यांनी रामविजय ग्रंथाचे वाचन केले व ठिक १२ वाजता भगवान श्री रामाच्या मूर्ती पाळण्यात ठेऊन त्याच्या वरती भगवान प्रभू रामचंद्रकी जय असा गजर करत मूर्ती वरती गुलाल व पुष्प वर्षाव करण्यात आला .

त्यानंतर महिलांनी श्रीराम जन्माचा पाळणा म्हटला.
यानंतर आरती करण्यात आली व मंत्रपुष्पांजली आनंद देशपांडे यांनी म्हटले .

