स्टार केबी न्यूज

संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २५ / ३ / २० २३) :
करेवाडी ता . इंदापूर येथे शुक्रवार दि . २४ मार्च रोजी नावजी बुवा यात्रे निमीत्त घेण्यात आलेल्या निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजीत करण्यात आले होते
यामध्ये  प्रथम क्रमांकाची कुस्ती पै . सिकंदर शेख व इराणचा पैहलवान महादी बर्जेगर यांच्यात झाली त्यामध्ये पै .सिंकदर शेख याने महादीस चितपट करून चांदीच्या गदेचा मान पटकावला दुसरी कुस्ती पै संतोष जगताप व पै . महारुद्र काळेल योच्यात झाली ,पै . अनिल कचरे विरुद्ध पै राकेश तांबुळकर ,पै .  दिपक पाडुळे विरुद्ध पै . अर्जुन काळे , पै . मामा तरंगे विरुद्ध पै . कालिचरण सोलनकर ,पै . प्रवीण करे विरुद्ध पप्पू गंगावणे ,पै भैय्या डांगे विरुध पै मयुर दगडे ,पै बबलू दुके विरुद्ध पै प्रतिक कदम ,पै . शहाजी माळी विरुद्ध पै . प्रकाश काळे , पै . बापू मारकड विरुध्द पै बाळू परीट गायकवाड ,पै अभिषेक करे विरुद्ध पै . सोनू चोरमले , पै . रोहन करे विरुद्ध पै . भैय्या माने ,पै सौरभ करे विरुध्द पै ज्ञानेश्वर चोरमले ,पै बबलू करे विरुद्ध गोवर्धन गावडे , पै . निखील मारकड विरुध्द पै . ओंकार दगडे पै , सुरज करे विरुध पै शुभम मदने ,आणि पै . प्रज्योत चोरमले विरुद्ध पै . विश्वजित लपाटे यांच्या नेत्रदिपक कुस्त्या पार पडल्या या करिता  राष्ट्रीय कुस्ती कोच मारकड सर , श्रावण चोरमले, संतोष पिसाळ यांनी पंच म्हणून काम पाहिले .
या कुस्त्यांचे समालोचन सुप्रसिद्ध समालोचक पै . धनाजी मदने पै . शरद झोळ पै . सुभाष दिवसे यांनी केले .
या कुस्त्यांचे आयोजन श्री . बाळासाहेब भिकाजी करे तंटामुक्ती अध्यक्ष श्री विजयकुमार शामराव करे (पो पाटील ) सतिश ( शेठ ) आप्पासो करे ( युवा उद्योजक ) रोहित वसंत करे , रामचंद्र यशवंत करे , पै.. गणेश अंकुश करे, पै. विकास उत्तम करे , अजित मारुती वाघमोडे यांनी केले .
या कुस्त्यां करिता कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक मधुकर भरणे , विजय कुमार चोरमले सरपंच , कर्मयोगीचे संचालक हनुमंत जाधव , प्रविण देवकर , बागायतदार भास्कर आबा पाडुळे, अमोल भिसे, पै. अशोक चोरमले , आहे शिवाजी चोरमले सरपंच करेवाडी, मा . जि .प . सदस्य अमोल भिसे , राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी तालुका अध्यक्ष विजय कुमार शिंदे , माजी पंचायत समीती सदस्य  प्रकाश शिंदे , कळाशीचे सरपंच राजेंद्र गोलांडे , बजरंग तात्या करे , आप्पा धोंडीबा करे , बबन करे , अविनाश जगताप , सागर झानदेव करे,सुनिल करे , गणपत करे , गेनदेव करे , मोहन नरुटे, विशाल करे ,
दुपारी ४ वा. सुरु झालेल्या मैदानात रात्री ९वा पर्यंत नेमलेल्या कुस्त्यां व्यतीरिक्त इतरही अनेक नेत्रदिपक कुस्त्यां पार पडल्या त्याने कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले .
करेवाडी सारख्या छोट्याश्या गावात अतिशय उत्कृष्ठ कुस्तीचे नियोजन केल्याने संयोजकाचे सर्व कुस्ती शौकीन त्यांना धन्यवाद व अभिनंदन करताना दिसले .