स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर* ( दि.२२) :
– सिन्नर तालुक्यातील श्री बुवाजी बाबा देवस्थान,( कुऱ्हे वस्ती) मऱ्हळ बु !! चे महंत दत्तूबाबा कुऱ्हे यांच्या हस्ते रुई इंदापूर येथील श्री क्षेत्र बाबीर बाबा मंदिराच्या जवळ गाय – वासराच्या मूर्तीची स्थापना गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर (दि.२२) सकाळी विधिवत करण्यात आली.
यावेळी रुई गावचे पोलीस पाटील व बाबीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व सिन्नर तालुक्यातून आलेल्या शेकडो भाविक भक्तगणांच्या उपस्थित गाय – वासरु मूर्ती स्थापनेचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी सिन्नर तालुक्यातील (कुऱ्हे वस्ती) मऱ्हळ बु !! येथून दि.२०/३/२३ रोजी महंत दत्तूबाबा कुऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान झालेला देवाच्या रथासह दिंडी सोहळा नियोजनबद्ध ५० वाहनाच्या ताफ्यात शेकडो भाविक भक्तगणांसह भक्तीमय वातावरणात अ.नगर येथे सायंकाळी मुक्कामी दाखल झाला.
हा सोहळा दि.२१ रोजी बाबीर देवस्थान रुईकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी रुई येथे हा भक्तिमय सोहळा (दि.२१) मुक्कामी दाखल झाला.
यावेळी रुई गावात ट्रस्टचे अध्यक्ष व पोलीस पाटील अजितसिंह पाटील यांनी महंत दत्तूबाबा कुऱ्हेंसह आलेल्या शेकडो भाविकांचे जंगी स्वागत केले.
यावेळी भाविक देवाच्या पालखी रथासमोर उस्फूर्तपणे हलगीच्या आवाजात..ढोलच्या निनादात.. नाचत गुलालाची उधळण करत मिरवणुकीत आस्वाद घेत होती.
भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये गायीला विशेष महत्त्वाचे स्थान आहे.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर महंत कुऱ्हे यांनी आणलेल्या गाय – वासराच्या मूर्तीची स्थापना महंत दत्तूबाबा कुऱ्हेंच्या हस्ते रुईचे पोलीसपाटील अजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी या सोहळ्याचा शेकडो भाविकांनी आस्वाद घेतला.
यावेळी महंत दत्तूबाबा कुऱ्हे यांचा सत्कार इंदापूरचे नानासाहेब सानप सर व रुईचे पोलीस पाटील अजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
