
पडस्थळ येथील ‘ कल्याण (भाऊ) पवार चि . सिध्देश्वर पवार व परिवाराच्या वतीने आयोजीत अखंड हरिनाम सप्ताह व भागवत ग्रंथ पारायण सोहळा सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न .

स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. २१ / ३ / २०२३ ) :
पडस्थळ ता इंदापूर जि . पुणे पवार वस्ती या ठिकाणी कै. चतुराबाई मल्हारी बोंगाणे (आजी) यांच्या कृपा आशिर्वादाने इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी . उपसभापती मा. पांडुरंग तात्या मारकड व मित्र परिवाराच्या सौजन्याने अखंड हरिनाम सप्ताह व भागवत ग्रंथ पारायण दि . १५ मार्च ते १९ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला होता .

यामधे दैनंदीन पहाटे काकडा सकाळी भागवत ग्रंथ पारायण त्यानंतर गाथा भजन सायंकाळी हरिपाठ रात्री किर्तन व तदनंतर पंचक्रोशीतील भजनी मंडळाचा हरिजागर असा कार्यक्रम पार पडला .

काकडा ह.भ.प. मोहन महाराज वाघ यांनी तर
गाथा भजन व हरिपाठ नेतृत्व तसेच किर्तन साथ ह . भ. प . भगवान महाराज परिसकर संत बाळूमामा वारकरी शिक्षण संस्था, बोरकडी बाळुमामाची या सस्थेचे विद्यार्थी, ह भ . प . सुर्यभान महाराज काळे श्री . कोटलिंग नाथ भजनी मंडळ संत निरंकारी सत्संग मंडल, पडस्थळ,चिंदादेवी , अजोती , पिंपरी , सुगाव ,शिरसोडी , माळवाडी ,नंबर १, २, ठाकूरवाडी , गडदे वस्ती ,कालठण नं . १, २, नरुटवाडी , गलांडवाडी ,नंबर १ , २ , कौठळी, राजवडी ,बिजवडी, करेवाडी , काळाशी , वरकुटे ,गोखळी ,तरंगवाडी , निमगाव केतकी ,शेळगाव , अभंग वस्ती ,झगडे वस्ती ,वडापुरी , सरडेवाडी , शहा , कांदलगाव , महादेव नगर , बाभूळगाव , भाटनिमगाव , बेडशिंगे , अवसरी ,विठ्ठलवाडी , सुरवड , या गावातील व इंदापूर तालुक्यातील भजनी मंडळ गायक टाळकर्यांनी सहभाग घेतला . 

या ५ दिवसीय सप्ताहामध्ये अनुक्रमे गुरुवर्य ह.भ.प . विठ्ठल महाराज वासकर (निवृत्त न्यायाधिश व वासकर कड प्रमुख पंढरपूर )
गुरुवर्य प.पु. ह.भ.प. परमेश्वर महाराज जायभाये ( अध्यापक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची ) गुरुवर्य प.पू . ह . भ . प . झानेश्वर महराज कदम (अध्यापक जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची ) गुरुवर्य ह. भ. प . माऊली महाराज मुढेकर ( गगोत्री आश्रम गंगाखेड ) यां चे किर्तन पार पडली तर काल्याचे किर्तन श्री १००८ महामंडलेश्वर ह . भ. प . मनिषानंद पुरीजी महाराज ( संत ज्ञानेश्वर महाराज आश्रम , रूढी पाटी परभणी ) यांचे काल्याचे किर्तन पार पडले

- यावेळी त्यानी वरील उदगार काढले तसेच त्यांनी श्रीकृष्ण च त्रितामधील अनेक प्रसंग सांगीतले यावेळी महिला व पुरुष भाविक मोठ्या संखेने उपस्थीत होते .

या सप्ताहामध्ये मृदंग साथ ह . भ. प . राम महाराज काजळे मृदंग महामेरु महाराष्ट्र भूषण अनेक पुरस्काराने गौरविले अध्यक्ष नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्था ताडबोरगांव जि परभणी , गुरुवर्य पंडीत दासोपंत स्वामी आळंदी, माऊली कांगणे , मारती पुरी , दादा आवटे , आकाश मुसळे तर हार्मोनियम साथ रामदास जगनाप (सर ) संभाजी बोंगाणे, शिवराम चोरमले,. विणेकरी महादेव ननवरे, लक्ष्मण कदम , बंडू राऊत
या सप्ताहातील विशेष आकर्षण बाल विणेकरी युटूब फेम कन्हैया ह व छोटे मृदंग वादक ह . भ . प . शुभम महाराज गायकवाड यांनी सर्व भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले त्यांना मोठ्या प्रमाणात बक्षीसेही मिळाली

तसेच साधारण २५ किर्तन कार महाराज मंडळी या
सप्ताहामध्ये टाळ घेऊन किर्तन साथ करत होते
या काल्याचा किर्तनानंतर गुरवर्य मनिषानंद पुरी महाराजांचा सत्कार पांडुरंग तात्या मारकड , महेंद्र दादा रेडके व कल्याण पवार यांचे हस्ते करण्यात आला व सागर धापटे पाटील अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्या देवी धर्मपीठ यांना युवा राष्ट्रीय समाजेवक पुरस्कार मानपत्र तसेच विठ्ठलाची मूर्ती मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला .
तसेच मोलाचे सहकार्य केले बद्दल माजी उपसभापती पांडुरंग तात्या मारकड यांचा फेटा हार श्रीफळ देऊन कल्याण पवार यांनी केला तसेच अखंड ५ वर्षे अतिशय उत्कष्ट अशा प्रकारचे भव्य दिव्य सप्ताहाचे आयोजन करून समाजात वेगळा आदर्श निर्माण करणारे कल्याण भाऊ पवार यांचा सत्कार संपूर्ण वारकरी व भजनी मंडळाच्या व ग्रामस्यांच्या वतीने फेटा हार श्रीफळ देऊन करण्यात आला त्याचप्रमाणे तेजपृथ्वी ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्षा सौ. अनिता खरात व मार्गदर्शिक नानासाहेब खरात यांचे वतीने कल्याण पवार व त्यांच्या सुविद्द पत्नि सौ . दिपाली पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला . नानासाहेब खरात ‘ यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे माजी अध्यक्ष महेंद्र दादा रेडके , खरेदी विक्री संघाचे माजी संचालक बळी काका बोंगाणे , पडस्थळचे माजी सरपंच सुभाष बोंगाणे , कर्मयोगीचे माजी संचालक भारत बोंगाणे इ. मान्यवर यावेळी उपस्थित होते .
या सप्ताहाचे आयोजन
श्री. कल्याण (भाऊ) पवार
चि. सिद्धेश्वर (बप्पा) कल्याण पवार यांचे वतीने करण्यात आले होते सुत्रसंचलन ह . भ . प . संतोष महाराज कांबळे यांनी केले
– – – – – – – – – – – – –

चौकट – दहिहंडी गुरुवर्य मनिषानंद पुरी महाराज यांचे हस्ते फोडण्यात आली त्यानंतर आरती व शेवटी काल्पाचा महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .
यास महिला पुरुष भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते .
