स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १६ / ३ / २० २३) :

दिनांक १५/३/२०२३ रोजी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हालगी वाद्य, यांच्या समवेत रॅलीला सुरुवात सायंकाळी पाच वाजता झाली. असंख्य नागरिकांच्या समवेत ही रॅली नगरपालिका इंदापूर येथून निघून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मेन रोड चौकातून नेहरू चौकामध्ये पोहोचली. सभेच्या गाळे धारक, व्यापारी वर्ग, नगरपालिकेचे माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सभा सुरू झाली . प्रथम रमेश आबा शिंदे व माजी नगरसेवक शेखर भैया पार्टील यांनी . आपले मनोगत मांडले

यावेळी
मा.नगरसेवक गोरख शिंदे, अविनाश कोतमिरे, दादासाहेब पिसे, सलीमभाई बागवान, सामाजिक कार्यकर्ते
हमीदभाई आत्तार,
सागर गानबोटे विकास पवार, मच्छिंद्र पवार,
जवाहरशेठ बोरा -जय इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष जयवंत नायकुडे सर, माजी नगराध्यक्षा सौ अलका ताटे . इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती चे प्रमुख प्रा . ताटे सर यांच्या भाषणाला सुरुवात झाली पाऊस येत असताना ही नागरिक जाग्यावरच बसून भर पावसात भाषण ऐकत होते एकही नागरिक पावसातून उठला नाही. संघर्ष समिती सन२०१७ पासून घरपट्टी वरील व्याज पाणीपट्टी वरील व्याज कोरोना काळातील दोन वर्षाची गाळे भाडे माफी व्याजमाफी,गाळे धारकांचे प्रलंबित अनेक प्रश्न , इंदापूर शहरातील विविध मुद्द्यांचा परामर्श घेतला. सभेचे अध्यक्ष श्री विशाल बोंद्रे दादा घरपट्टी विरोधात आपले मत मांडले. यावेळ नंदकुमार खरवडे वसंत जाधव महेंद्र वाघमारे राजेंद्र हजारे मंगेश वाघमोडे,मकसूद मोमीन, अशोक ननवरे, जयवंत आपूने , गफ्फार बेपारी दिलीप पाठक, अरुण कोकाटे दिलीप शहा प्रदीप पवार,,बाबू कवितके, प्रशांत इंगोले, संतोष जामदार, गणेश कोतमिरे , बानकर . रघुनाथ खरवडे, शांतीलाल परदेशी, व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
भारत बोराटे सर, महादेव चव्हाण सर, शिवाजी जाधव, दीपक ताटे परमेश्वर काळे, हनुमंत ठोकळे,
पत्रकार बंधू उपस्थित होते .