स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २० / २ / २०२३ ) :

कालठण नं. १ ता. इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी विजया दशमी च्या मुहूर्तावर सुरु करण्यात आला यायोग वर्गास चार महिने झाले त्याला मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष योग साधकांचा प्रतिसाद लाभला असून दररोज पहाटे पाच ते साडेसहा या वेळात उत्कर्ष विद्या मंदिराच्या प्रांगणात ब्रम्ह मुहुर्तावर योगा वर्ग घेतला जातो या मध्ये देश व राज्यासाठी योगदान बलिदान त्याग करणारे तसेच युग पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजर्‍या केल्या जातात त्याचा च भाग म्हणून रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
या निमीत्त इतिहासाच्या अभ्यासक व लेखक कला आणि जवानीची महाविद्यालयाचे माजी प्राध्यापकश्री बाळासाहेब सावंत यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी व्याख्यान आयोजित केले होते त्यावेळेस ते बोलत होते त्यांनी यावेळी

प्रा .सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अतिशय कठीण प्रसंग तसेच त्यांचा धाडसीपणा मुरब्बी राजकारणी संकटाला न डगमगणारा राजा त्याचप्रमाणे रयतेचा विषयी जनतेविषयी स्त्रीयां विषयी असलेला आदर भावना तसेच अनेक कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याची त्यांची कला तसेच उत्तम लेखन प्रशासक अशा विविध पैलू विषयी त्यांनी मार्गदर्शन आपल्या व्याख्यानातून केले .

प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर
प्रा . सावंत सरांचा शाल पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
त्याचप्रमाणे कालठण चे सुपुत्र रविकुमार लालासाहेब जगताप हे दुबई येथे नोकरी साठी असतात ते त्या ठिकाणी योगा करतातच परंतु ते गेली १ महिना आपल्या गावी कालठण येथे सुट्टी वर आले नंतर दररोज पहाटे कालठण येथे योगा वर्गात येऊन त्यांनी सातत्याने योग साधना केली ते आज दुबईला आपल्या नोकरीस जाणार होते त्यांचा सत्कारही फेटा बांधुन श्रीफळ देऊन त्यांना देण्यात आला .
यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष योग साधक उपस्थित होते .