स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २१ / २ / २० २३) :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर बिजवडी ता. इंदापूर येथे सोमवार दि. २०फेब्रुवारी ते रविवारी दि. २६ फेब्रुवारी या कालावधीत होत असून या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर विद्यार्थ्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वासुदेव काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ चांगली राहणीमान, स्वच्छता आणि वेळेचे नियोजन आपल्या जीवनात महत्त्वाचे असून ही शिबिर विद्यार्थ्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरतील. समाजसेवेबरोबरच राष्ट्रीय सेवा योजना हे राष्ट्रीय सेवा योजनेचे मूलमंत्र विद्यार्थ्यांनी जोपासावे या शिबिरातून उत्तम नागरिक घडतील.’
डॉ. वासुदेव गाडे म्हणाले की,’ समाजामधील जे अनेक प्रश्न आहेत ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यावेत तसेच त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हे विद्यार्थी तयार व्हावेत हे राष्ट्रीय सेवा योजनेचे या पाठीमागील भूमिका आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जबाबदार नागरिक निर्माण व्हावा.राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. आपण अभ्यास आणि आपली सार्वजनिक जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडली पाहिजे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे.
यावेळी कुमार शिंदे, महेश मोहिते ,स्वप्नाली गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.कार्यक्रमाधिकारी डॉ. राजेंद्र साळुंखे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेविषयीची माहिती दिली.
यावेळी ॲड.मनोहर चौधरी,ॲड.अशोक कोठारी, विलासराव वाघमोडे, भागवत गटकुळ, औदुंबर कचरे, नारायण वीर, हिरालाल पारेकर, आबासाहेब शिंगाडे,आबा मोहोळकर, अंकुश जाधव, छगन भोंगळे,छगन बोराटे, मच्छिंद्र अभंग, डॉ. महादेव वाळुंज, देवराव लोकरे,राजेंद्र पवार, अतुल शेटे, गलांडे, डॉ.शिवाजी वीर,डॉ.भिमाजी भोर, डॉ.सदाशिव उंबरदंड उपस्थित होते.
प्रा. सुवर्णा जाधव आणि प्रा.फिरोज शेख यांनी सूत्रसंचालन केले.
आभार उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे यांनी मानले.