इंदापूर स्टार केबी न्यूज

संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २० /४ / २० २६):  बावडा (ता. इंदापूर) येथील स्वयंभू श्री जय गणेश (गणोबा) देवस्थान ट्रस्ट, पाटील वस्ती यांच्या वतीने गावातील स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या नवनियुक्त अधिकार्‍यांचा आणि भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या जवानाचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीच्या जोरावर या युवकांनी मिळवलेले यश संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

या गुणवंतांचा झाला सत्कार

​कार्यक्रमात खालील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला:

  • श्री. ओंकार लक्ष्मण आसबे: राजपत्रित अधिकारी (पुरवठा अधिकारी) पदी निवड.
  • श्री. ऋषिकेश भगवान घोगरे: सहाय्यक नगर रचनाकार (वर्ग-१, राजपत्रित अधिकारी) पदी निवड.
  • श्री. बाळासाहेब विठ्ठल माने: गुप्तचर विभागात पोलीस इन्स्पेक्टर (PI) पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल.
  • मेजर किशोर घोगरे: भारतीय लष्करातून यशस्वी देशसेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याबद्दल.

‘मन, मनगट आणि मेंदू’ यांचा समतोल राखा – मान्यवरांचे मार्गदर्शन

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. अनिल पाटील यांनी केले. यावेळी बोलताना प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ. लक्ष्मण आसबे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा प्रवास उलगडला. ते म्हणाले की, “अतिशय कष्टाने आणि जिद्दीने या मुलांनी हे यश मिळवले आहे. प्रशासकीय सेवेत काम करताना गावच्या आणि समाजाच्या नावाचा लौकिक वाढवा.” तसेच इंदापूर पंचायत समीतीचे माजी सभापती श्री. प्रशांत पाटील म्हणाले स्व . शंकरराव पाटील भाऊ यांनी इंदापूर तालुक्यात शिक्षणाची चळवळ उभा केली त्यांचे संस्कारामुळेच आज अशी रत्ने निर्माणहोत आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. मयुर पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी त्यांनी अनेक किस्क किस्रूस किस्से सांगीतले आपल्या बावडयाचे पूर्वी शेती राजकारण हे नाव होते परंतु आता अशी मुले स्पर्धा परिक्षेच्या माध्यमांतून उच्च पदस्थ अधिकारी होऊन देशाची  राष्ट्राची सेवा करून गावाची मान उंचावत आहेत या सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ग्रामस्थांची मोठी उपस्थिती

​या कार्यक्रमाचे नेटके आयोजन श्री. मिलिंद पाटील, श्री. कैलास पाटील आणि श्री. सुदेश गायकवाड यांनी केले होते. याप्रसंगी नवनाथ पवार, संतोष पाटील, सुधीर पाटील, महेंद्र शहा, भगवान घोगरे, सिद्धार्थ पाटील, कपिल पाटील, प्रतीक घोगरे, प्रीतमकुमार देवकर, राजू घोगरे, प्रा. दिलीप पाटील, जयदत्त पाटील, सतीश ढवळसकर, सुभाष घोगरे, युनूस मुलानी, अमीर मुलानी, जमीर मुलानी, विष्णू खरात, लखन भोसले पत्रकार राजेंद्र कवडे देशमुख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाच्या शेवटी श्री. प्रसाद पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.