स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर( दि. २० /४ / २० २६):
पतंजली योगपीठ हरिद्वारचे केंद्रीय प्रभारी पू. स्वामी परमार्थदेवजी यांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेत, इंदापूर तालुक्यातील मौजे झगडेवाडी येथे पाच दिवसीय ‘इंटिग्रेटेड योग शिबिराचे’ अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. दि. १५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या शिबिरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्वामीजींच्या सूचनेला ग्रामस्थांचा प्रतिसाद
मार्च २०२६ मध्ये इंदापूर येथे झालेल्या योग शिबिरादरम्यान पू. स्वामी परमार्थदेवजी यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात योग शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. या आवाहनाला प्रतिसाद देत झगडेवाडी येथील ग्रामस्थांनी या विशेष शिबिराचे आयोजन केले.
प्रमुख उपस्थिती आणि सहभाग
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी गावातील प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये:
- आदर्श सरपंच: श्री. अतुल झगडे
- माजी सरपंच: सौ. रूपाली अतुल झगडे
- उपसरपंच व सदस्य: डॉ. दादाराव झगडे, नामदेव झगडे, उपसरपंच सचिन अभंग, नवनाथ अभंग, प्रल्हाद अभंग, गेमदेव अभंग, मोहन झगडे, लक्ष्मण झगडे, अरुण झगडे.
- यांसह गावातील महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तज्ज्ञ योगशिक्षकांचे मार्गदर्शन
पतंजलीचे तहसील प्रभारी दत्तात्रय अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी योगशिक्षकांनी साधकांना योगाभ्यासाचे धडे दिले. यामध्ये:
श्री. शहाजी बोराटे, श्री. भाऊसाहेब शिंदे, श्री. संजय मोरे, श्री. भारत बोंगाणे, डॉ. नंदकुमार यादव, श्री. लहू गाढवे, श्री. अंकुश ढूके, श्री. सुधीर मखरे, श्री. राजाभाऊ सोनमाळी, श्री. दशरथ मोरे, श्री. विलास गाढवे.
तसेच राजश्री शिंदे, सौ. नीता नलवडे, सौ. इंदुमती बोराटे, सौ. प्रतिभा गुजराथी, सौ. आरती गुजराथी, सौ. हेमलता बोंद्रे आणि अश्विनी काकडे या महिला योगशिक्षिकांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.
योग वर्ग निरंतर सुरू ठेवण्याचा संकल्प
पाच दिवसांच्या या शिबिरामुळे संपूर्ण झगडेवाडी गावात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ शिबिरापुरते मर्यादित न राहता, भविष्यातही गावात ‘निशुल्क योग वर्ग’ निरंतर आणि सातत्याने चालू ठेवण्याची ग्वाही सरपंच व ग्रामस्थांनी या प्रसंगी दिली.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागात आरोग्याविषयी जनजागृती होण्यास मोठी मदत होत असल्याचे मत उपस्थित साधकांनी व्यक्त केले.
