स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १० /३ / २०२६ :
तालुक्यातील पडस्थळ येथे कै. चतुराबाई मल्हारी बोंगाणे (आजी) यांच्या कृपाशीर्वादाने आणि चि. सिद्धेश्वर (बप्पा) यांच्या जन्म संकल्पपूर्ती निमित्त ‘अखंड हरिनाम सप्ताह व श्री शिवलीलामृत पारायण’ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा गुरुवार, दि. १२ मार्च ते सोमवार, दि. १६ मार्च २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.
श्री कोटिलिंगनाथ यांच्या आशीर्वादाने आयोजित या पाच दिवसीय नामयज्ञात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ८ ते ११ श्री संत तुकाराम गाथा पारायण, ११ ते १२ गाथा भजन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ९ ते ११ या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तने व त्यानंतर हरिजागर होणार आहे.
कीर्तन महोत्सवाचे वेळापत्रक:
- गुरुवार दि. १२/०३: ह.भ.प. पांडुरंग महाराज धर्माधिकारी (इंदापूर)
- शुक्रवार दि. १३/०३: ह.भ.प. पांडुरंग महाराज शेळके (गाडअकोले)
- शनिवार दि. १४/०३: ह.भ.प. संतोष महाराज काळे (सणसर)
- रविवार दि. १५/०३: ह.भ.प. प्रदीप महाराज जाधव (कविटगाव-जेजुरी)
- सोमवार दि. १६/०३: सकाळी १० ते १२ ह.भ.प. चंद्रकांत महाराज पानसरे (आळंदी) यांचे काल्याचे कीर्तन होईल.
या सोहळ्यासाठी व्यासपीठ चालक म्हणून रामायणाचार्य मोहन महाराज वाघ आणि गायनाचार्य म्हणून मल्लीनाथ महाराज सूर्यवंशी काम पाहणार आहेत. तसेच याप्रसंगी इंदापूर पतंजली योग समितीचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय अनपट (नाना) यांचा विशेष सत्कार देखील आयोजित करण्यात आला आहे.
या सप्ताहासाठी श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्था (अहिल्यानगर), श्री कोटिलिंगनाथ भजनी मंडळ व इंदापूर तालुक्यातील पंचक्रोशीतील भजनी मंडळे व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. तरी या मंगलमय सोहळ्याचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन श्री. कल्याण (भाऊ) पवार, चि. सिद्धेश्वर (बप्पा) कल्याण पवार, समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळ, पडस्थळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
