स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे
​इंदापूर ( दि. २४ /२ / २०२६):

प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात आणि प्रलंबित विकासकामांच्या मागणीसाठी काळठाण नं. १ता . इंदापूर जि . पुणे ग्रामपंचायती समोर सुरू असलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे इंदापूर तालुका सचिव दादासो लक्ष्मण जगताप यांनी पुकारलेल्या या आंदोलनास आता गावातील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून, प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
​काय आहे प्रकरण?

कालठण नं. १ येथील स्मशानभूमीतील लाईटची सोय, ग्रामपंचायत कार्यालयातील शौचालय व मुतारीची दुरुस्ती आणि आरोग्य सुविधांबाबत दादासो जगताप यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. मात्र, या तक्रारींची दखल घेण्याऐवजी प्रशासनाकडून उद्धट वागणूक मिळाल्याचा आरोप करत त्यांनी २३ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

​ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा

आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी कालठण मधील अनेक ग्रामस्थांनी उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्येही प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी आहे. ग्रामस्थांच्या वाढत्या गर्दीमुळे आणि पाठिंब्यामुळे या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढली आहे.

​मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही

जोपर्यंत कालठण नं. १ ग्रामपंचायतीमधील कामांची चौकशी होत नाही आणि मागण्यांचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका दादासो जगताप यांनी घेतली आहे. आता या आंदोलनाची दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी कधी भेट देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.