स्टार केबी न्यूज

संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. १२ / २ / २० २३) :

ऑल इंडिया लिनेस क्लब, मल्टीपल चतुर्भुजा डिस्ट्रिक्ट दिव्यध्वनी एम एच 2 च्या वतीने शपथ विधी सोहळा कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व अकलूज, सोलापूर, बारामती, कोल्हापूर, सातारा, कराड, वेंगुर्ला, गडहिंगल , पुणे येथी पदाधिकारी आणि सदस्य महिला भगिनीचे स्वागत ढोल लेझीम वाजवित केले त्यांना केळीच्या पानावर पुरण पोळीचे सुग्रास जेवण देऊन शपथ विधी सोहळा खुप मोठ्या उत्साहात साजरा केला, माजी मल्टिपल प्रेसिडेंट नलिनी पारेख यांनी लिनेस क्लबने देश पातळीवर सेवाभावी कार्य करण्यासाठी महिला संघटन उभे करून भारत देशभर कार्य चालू आहे. सन 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य अंतर्गत सोलापूर, कोल्हापूर,पुणे अशा अनेक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व,नेतृत्व करण्याचा मान इंदापूर तालुक्याला मिळाला असुन आपण सामजिक उपक्रम यशस्वी पणे राबवावे” असे मत व्यक्त केले.नूतन डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट प्रा जयश्री गटकुळ यांनी “सर्व पदाधिकारी आणि सर्व लिनेस सदस्य यांच्या योगदानातून मोठं कार्य करण्याचे आव्हान स्वीकारले असून महिला सक्षम, सबल आणि महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत” अशी ग्वाही प्रा जयश्री गटकुळ यांनी दिली, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी लिनेस उज्वला प्रकाश गायकवाड यांनी “सन 2022 मध्ये लिनेस क्लब ऑफ इंदापूर सामजिक उपक्रम राबवल्यामुळे बेस्ट प्रेसिडेंट व बेस्ट मल्टिपल पुरस्कार मिळाले. या वर्षी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी व लिनेस क्लब ऑफ इंदापूर प्रेसिडेंट या दोन्ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार आहे.सर्व लिनेस सखीसाठी आमचा हात तुमची साथ या तत्वावर लिनेस साठी काम करणार आहे” असे मत व्यक्त केले, डिस्ट्रिक ट्रेझर लिनेस कल्पना भिमाजी भोर यांनी “इंदापूर शहरांमध्ये 2004 पासून क्लबच्या माध्यमातून आपण समाजाचे काहीतरी देणे आहोत या भावनेतून समाजसेवा करत आहे लिनेस क्लबचे आर्थिक व्यवस्थापन करून खजिनदार पदाचा मी मान ठेवून आर्थिक व्यवहार पारदर्शक करणार आहे, क्लबच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकातील लोकांचे सेवा कार्य करणार आहे” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पास्ट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट अंजू मालू यांनी केले, सूत्रसंचालन प्रा सुषमा जाधव यांनी केले
चार्टर मल्टिपल प्रेसिडेंट नलिनी पारेख यांनी पदाधिकारी यांना शपथ दिली.पास्ट मल्टिपल प्रेसिडेंट विद्या पाच्चापुरकर यांनी अध्यक्षीय भाषणात लिनेस क्लबच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण, प्रोत्साहन देऊन सक्षम, सबल बनविणे, गरजू महिलांसाठी कायदेविषयक शिबिर. आरोग्य शिबिर, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत असे अनेक विविध सामजिक उपक्रम यशस्वीपणें राबविण्याबाबत मार्गदर्शन केले,पास्ट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट अंजू मालू, प्रांजल गूंजोटे, धनश्री गांधी, सुमन जाचक, वीणा यादव, रिजन को ऑर्डीनेटर रजनी नांगरे,रिजन को ऑर्डीनेटर छाया बुराडे, सुनंदा अरगडे, रेखा लाहोटी, जयश्री खबाले, अर्चना शिंदे, संगिता चौधरी, श्रेया चौधरी, सारिका पवार, सविता बंगाळे, रतन पाडूळे, स्मिता शितोळे,जयश्री गानबोटे, राजश्री जगताप, अन्य मान्यवर उपस्थित होते, आभारप्रदर्शन सुनंदा अरगडे यांनी केले.