स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ८ / २ / २०२३ ) :

पुणे जिल्यातील इंदापूर येथील दत्तनगर रोड वरील गुरुकृपा संस्कृतिक भवन या ठिकाणी आज रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २० २३ रोजी देशपातळीवरील सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक इंजि. हेमचंद्र शिंदे सर यांचे ‘करिअर वर बोलू काही’ या विषयावर मार्गदर्शन पत्र चर्चासत्र पार पडले .
5
या कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर मधील ‘विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमी, इंदापूर’ व ‘संकल्प मानव सेवा ट्रस्ट, इंदापूर’ यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. अशा प्रकारचा हा अतिशय नेटका आणि सुंदर इंदापूर मधील पहिलाच कार्यक्रम होता.
या कार्यक्रमाला इंदापूर च्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ. अंकिता ताई शहा, इंजि. हेमचंद्र शिंदे सर, मुकुंदशेठ शहा, प्रा. कृष्णजी ताटेसर, श्री. कुणाल काळे सर, संतोषजी जामदार यांचे हस्ते सरस्वती पुजन दीप प्रज्वलन करुन सुरवात करण्यात आली.
यावेळी इंजि. हेमचंद्र शिंदे सर, सौ. अंकिताताई शहा, मुकुंदशेठ शहा, प्रा. कृष्णजी ताटेसर, मुख्याधिकारी इं. न. पा. रामराजे कापरे साहेब, विजयकुमार परीट साहेब,आनंद भोंग साहेब यांचा आयोजकांचे वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात श्री. शिंदे सरांनी आपल्या वैशिष्ट्यःपूर्ण शैलीत अतिशय तणावरहित वातावरण निर्मिती करीत, हसत खेळत, उपस्थितांशी गप्पा मारीत, सर्वांना सामावून घेत रंगत भरली. आपल्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया क्षेत्रातील 23 वर्षांचा अनुभवा वर प्रामुखाने सर्वच पालकांना हमखास पडणाऱ्या
1) ‘१० वी, १२ नंतर पुढे काय ?’ या प्रश्ना सह
2) NEET / JEE यांसारख्या इंटरनॅशनल परीक्षांना सामोरे जाताना
3) १९ वर्षांनंतर प्रथमच शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत झालेले मोठे बदल या बद्दल सखोल मार्गदर्शन, त्यासंबंधी सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे थोडक्यात व सहज सोप्या भाषेत दिली.
विद्यानिकेतन अँकाडमीचे प्रमुख कुणाल काळे सर यांनी ‘INDIA VISION 2047 / बदलत्या काळाप्रमाणे … शैक्षणिक समीकरणे’ या बद्दल माहिती सांगितली. आभार प्रदर्शन संकल्प मानव सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष संतोषजी जामदार यांनी केले.

चौकट 1 : मार्गदर्शनाचा लाभ घेणे साठी करमाळा, केम, कंदर, बावडा, पळसदेव, टेंभुर्णी, अकलुज, इंदापुर व पंचक्रोशीतील विद्यार्थी, शिक्षक वृंद, पालक वर्ग व नागरिक यांनी तुफान गर्दी करून हॉल ‘हाऊसफुल’ केला होता.
यावेळी विद्यानिकेतन अँकाडमीची विद्यार्थीनी आश्लेशा बाळासाहेब चव्हाण, अँकाडमीचे सर्व शिक्षक व संकल्प मानव सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष श्री संतोष लक्ष्मण जामदार यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल इंजि हेमचंद्र शिंदे यांनी सन्मान चिन्ह देउन सत्कार केला.
चौकट 2 : इंजि. हेमचंद्र शिदे यांनी आत्तापर्यंत 3000 अधिक सेमिनार्स भारत भर घेतले असून 15 लाखांपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. यावेळी श्री. शिंदे सरांनी संतोषजी जामदार यांनी कार्यक्रम आयोजीत करण्याचे साठी घेतलेल्या कष्ट व तळमळीचे विशेष कौतुक केले व संतोषजी गेले चार वर्षांपासून कार्यक्रम इंदापुरात घेणेसाठी माझे संपर्कात होते तो सुदिन आज आला असे सांगितले. येथुन पुढे सुद्धा मी माझे जन्म भुमी इंदापुर असलेने तालुक्यातील मुलांना जास्तीत जास्त वेळ देईन असा शब्द श्री शिंदे यांनी उपस्थितांना दिला. करिअर मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे यांचे ‘करिअर वर बोलू काही’ … मार्गदर्शन संपन्न

पुणे जिल्यातील इंदापूर येथील दत्तनगर रोड वरील गुरुकृपा संस्कृतिक भवन या ठिकाणी आज रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी देशपातळीवरील सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक इंजि. हेमचंद्र शिंदे सर यांचे ‘करिअर वर बोलू काही’ या विषयावरील कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन इंदापूर मधील ‘विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमी, इंदापूर’ व ‘संकल्प मानव सेवा ट्रस्ट, इंदापूर’ यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. अशा प्रकारचा हा अतिशय नेटका आणि सुंदर इंदापूर मधील पहिलाच कार्यक्रम होता.
या कार्यक्रमाला इंदापूर च्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ. अंकिता ताई शहा, इंजि. हेमचंद्र शिंदे सर, मुकुंदशेठ शहा, प्रा. कृष्णजी ताटेसर, श्री. कुणाल काळे सर, संतोषजी जामदार यांचे हस्ते सरस्वती पुजन दीप प्रज्वलन करुन सुरवात करण्यात आली.
यावेळी इंजि. हेमचंद्र शिंदे सर, सौ. अंकिताताई शहा, मुकुंदशेठ शहा, प्रा. कृष्णजी ताटेसर, मुख्याधिकारी इं. न. पा. रामराजे कापरे साहेब, विजयकुमार परीट साहेब,आनंद भोंग साहेब यांचा आयोजकांचे वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात श्री. शिंदे सरांनी आपल्या वैशिष्ट्यःपूर्ण शैलीत अतिशय तणावरहित वातावरण निर्मिती करीत, हसत खेळत, उपस्थितांशी गप्पा मारीत, सर्वांना सामावून घेत रंगत भरली. आपल्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया क्षेत्रातील 23 वर्षांचा अनुभवा वर प्रामुखाने सर्वच पालकांना हमखास पडणाऱ्या
1) ‘१० वी, १२ नंतर पुढे काय ?’ या प्रश्ना सह
2) NEET / JEE यांसारख्या इंटरनॅशनल परीक्षांना सामोरे जाताना
3) १९ वर्षांनंतर प्रथमच शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत झालेले मोठे बदल या बद्दल सखोल मार्गदर्शन, त्यासंबंधी सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे थोडक्यात व सहज सोप्या भाषेत दिली.
विद्यानिकेतन अँकाडमीचे प्रमुख कुणाल काळे सर यांनी ‘INDIA VISION 2047 / बदलत्या काळाप्रमाणे … शैक्षणिक समीकरणे’ या बद्दल माहिती सांगितली. आभार प्रदर्शन संकल्प मानव सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष संतोषजी जामदार यांनी केले.
चौकट 1 : मार्गदर्शनाचा लाभ घेणे साठी करमाळा, केम, कंदर, बावडा, पळसदेव, टेंभुर्णी, अकलुज, इंदापुर व पंचक्रोशीतील विद्यार्थी, शिक्षक वृंद, पालक वर्ग व नागरिक यांनी तुफान गर्दी करून हॉल ‘हाऊसफुल’ केला होता.
यावेळी विद्यानिकेतन अँकाडमीची विद्यार्थीनी आश्लेशा बाळासाहेब चव्हाण, अँकाडमीचे सर्व शिक्षक व संकल्प मानव सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष श्री संतोष लक्ष्मण जामदार यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल इंजि हेमचंद्र शिंदे यांनी सन्मान चिन्ह देउन सत्कार केला.
चौकट 2 : इंजि. हेमचंद्र शिदे यांनी आत्तापर्यंत 3000 अधिक सेमिनार्स भारत भर घेतले असून 15 लाखांपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. यावेळी श्री. शिंदे सरांनी संतोषजी जामदार यांनी कार्यक्रम आयोजीत करण्याचे साठी घेतलेल्या कष्ट व तळमळीचे विशेष कौतुक केले व संतोषजी गेले चार वर्षांपासून कार्यक्रम इंदापुरात घेणेसाठी माझे संपर्कात होते तो सुदिन आज आला असे सांगितले. येथुन पुढे सुद्धा मी माझे जन्म भुमी इंदापुर असलेने तालुक्यातील मुलांना जास्तीत जास्त वेळ देईन असा शब्द श्री शिंदे यांनी उपस्थितांना दिला.