स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि.९ फेब्रुवारी २० २३) :

दि. १५ डिसेंबर २०२२ ते १९ जानेवारी २०२३ या कालावधीत पुणेजिल्हा परिषद पुणे व डाएट आयोजित आंतरशालेय नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाट्यसंहिता सुंदर लेखन व दिग्दर्शनाचा पुरस्कार हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभंगवस्तीच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती सुरेश लोंढे यांना मिळाला असून “सुदृढ मन” या नाटिकेचे सुंदर असे लेखन व दिग्दर्शनही त्यांनी केलेले आहे. 
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आयुष प्रसाद साहेब, डायटच्या प्राचार्य डॉ. शोभा खंदारे, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, अष्टपैलू चित्रपट अभिनेते मा. सयाजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा दि. ०८ फेब्रुवारी २०२३ रोजी पुणे येथे संपन्न झाला. हा पुरस्कार व सर्व गुणसंपन्न कार्याबद्दल इंदापूर तालुक्यातील अभंगवस्ती येथील प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. स्वाती लोंढे यांचे सर्वचं स्तरातून अभिनंदन केले जात आहे..
