
केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे
‘सर्वोच्च न्यायालयाने नव्याने लागू करण्यात आलेल्या ‘ई-फायलिंग ‘ या नवीन नियमावली विरोधात इंदापूर वकील संघटनेच्या वतीने इंदापूर न्यायालय येथे गुरुवारी (दि.१९) ‘एक दिवस लाक्षणीय कामबंद’ आंदोलन करण्यात आले.
ई- फायलिंग मुळे न्यायालयात नवीन दाखल होणाऱ्या केसेसचे स्वरूप पूर्णतः बदलणार आहे.
व न्यायालयीन कामकाजाची कागदपत्रे व नवीन दावे व केसेस ऑनलाईन पद्धतीने दाखल होणार आहेत. त्यामुळे त्याचा वाढणारा आर्थिक भार हा थेट पक्षकार यांच्यावरती पडणार आहे.
तसेच ई-फायलिंग संदर्भात ज्या पायाभूत सुविधा न्यायालय प्रशासनाने वकील व पक्षकार यांच्यासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या अद्याप महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पोहोचलेल्या नाहीत. तसेच संगणक प्रिंटर, स्कॅनर, पुरेशी इंटरनेट सेवा ब्रॉडबँड या गोष्टी महाराष्ट्राच्या प्रत्येक वाडी-वस्ती वरती राहणारे पक्षकार वकील यांच्याकडे फारशा उपलब्ध नसल्याने त्याचा थेट परिणाम न्यायालयाच्या कामकाजावरती व न्यायदान होणार आहे. आपल्या देशांमध्ये सलग चोवीस तास वीज पुरवठा होत नाही अशा ग्रामीण भागामध्ये संपूर्ण न्यायव्यवस्था संगणकीकृत केल्यानंतर त्या अनुषंगाने येणाऱ्या समस्या याबाबत कोणतेही खुलासा प्रशासनाने अद्याप केलेला नाही या सर्वांचा विचार करता हा आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा व जोपर्यंत सर्व पायाभूत सुविधा पोहोचत नाहीत तोपर्यंत असा कुठलाही प्रणालीचा अवलंब करू नये अशी मागणी यावेळी इंदापूर बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.
या आंदोलनात इंदापूर वकील संघटनेचे सचिव अॅड.आशुतोष भोसले, उपाध्यक्ष ॲड. जमीर मुलाणी, उपाध्यक्ष अॅड.सुभाष भोंग, अॅड. अशोक कोठारी, अॅड.एल. पी. शिंगाडे, अॅड. शशिकांत साबळे, अॅड. प्रमोद खरात, अॅड. तेजसिंह पाटील, अॅड. नारायण ढावरे, अॅड. बापूसाहेब साबळे, अॅड. जे. एन. पोळ, अॅड. सचिन राऊत, अॅड. श्रीकांत करे, अॅड.रोहित लोणकर, अॅड.आसिफ बागवान, अॅड.अवधूत डोंगरे, अॅड.रणजीत चौधरी, अॅड.आनंद केकान, दशरथ मगर, अॅड.आदित्य थोरात,अॅड. विनोद पारेकर, अॅड. राजेंद्र सोमवंशी,अॅड.अंजली दास, अॅड.किरण मेहता, अॅड.मनीषा आदलिंग, अॅड.सुचित्रा देवकाते आदी सहभागी होते.
