स्टार केबी न्यूज
संपादक – श्री . काकासाहेब मांढरे इंदापूर:-

राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची नुकतीच पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे शासन परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.

यामध्ये माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, गणेश मधुकर बिडकर, विजय सोपान शिवतारे, यांना जिल्हा नियोजन ज्ञान असलेले नामनिर्देश सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.

अनेक महिन्यांच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीची यादी जाहीर करण्यात आली आहे.