स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . ८ / ७ / २० २४ ) :
-मौजे राजवडी ता . इंदापूर जि.पुणे या गावचे सुपुत्र कर्तव्य दक्ष पोलिस अधिकारी श्री मारुती किसन गायकवाड यांची पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत वाकड पोलीस स्टेशन येथे पीएसआय पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार राजवडी व गागरगाव ग्रामस्थांच्या वतीने हॉटेल न्यु गारवा येथे आयोजित करण्यात आला होता. इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती मा . श्री . नारायण आबा वीर यांच्या हस्ते गायकवाड साहेब यांचा शाल श्रीफळ फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राजवडी गावातील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी गायकवाड साहेब यांना शुभेच्छा दिल्या.
