स्टार केबी न्यूज

काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २५ / १० / २० २३) :
गलांडवाडी गावच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने या अपघातामध्ये दशरथ मारुती चोरमले (वय ५० वर्षे, काळके
वस्ती, गलांडवाडी नंबर १) यांचा जागीच मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेमुळे चोरमले कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी या कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.मृत्यूच जबाबदार असणाऱ्या आरोपीला मोठी शिक्षा झाली पाहिजे असे ते यावेळी म्हणाले.
राजवर्धन पाटील म्हणाले की,’ सण व उत्सवाच्या काळात चोरमले कुटुंबावर या अपघाताने मोठा आघात झाला असुन या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने या कुटुंबाला द्यावी.