स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (दि . २२ /६ / २० २४ ):
इंदापूर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करीत गज ढोल, झांज पथक, लेझिम यांचेसह घोडे, उंट आणि ढोल ताशाच्या दणदणाटात भव्य मिरवणूक काढीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्रा.संजय सोनवणी यांचे व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी बोलताना आ.दत्तात्रय भरणे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे अनुकरण करून त्या प्रमाणे आचरण करावे असे आवाहन केले.
आ.यशवंत माने यांनी अहिल्यादेवीचे सामाजिक कार्य हे संपूर्ण देशभर ओळखले जाते. त्यांच्या विचारांचे अनुकरण आपण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, धर्म संकटात असताना अहिल्यादेवी यांनी केलेले कार्य अनमोल आहे. त्यांच्या काळात अस्तित्वात असलेले स्वराज्याचे सुराज्य जपण्यासाठी आपण सर्वांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले पाहिजे असे आवाहन केले.तर शशिकांत तरंगे यांनी सरकारने धनगर समाजासाठी घोषित करण्यात आलेल्या निधी मंजुर करावा, इंदापूर शहरात ओबीसी बांधवांच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह बांधावे अशी मागणी केली.यावेळी किरण गोफणे, पोपट पवार यांनी मनोगते व्यक्त केली.
दरम्यान जयंती उपक्रमानिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, तहसिलदार श्रीकांत पाटील, परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, युवा नेते सनी देवकाते, शशिकांत तरंगे, तानाजी शिंगाडे, माऊली हाके,माऊली चवरे, विजय वाघमोडे, तुकाराम बंडगर,सिताराम जानकर, तुकाराम करे, ज्ञानदेव डोंबाळे,दत्तू पांढरे, विजया कोकाटे, स्मिता पवार यांचेसह अन्य मान्यवर, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक पोपट पवार, अध्यक्ष लक्ष्मण देवकाते, कार्याध्यक्ष किरण गोफणे, आप्पा माने, तानाजी नरुटे यांचेसह आजी माजी पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते.आभार आप्पा माने यांनी मानले.
—————————————
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव.
अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे, तहसीलदार श्रीकांत पाटील, कुस्तीमार्गदर्शक मारुती मारकड, कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर, गोखळी गुरुकुलचे बाळासाहेब हरणावळ, राजमाता ग्रुपच्या मयुरा पाटील, वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ.निखिल धापटे, नीट परीक्षेत यश मिळाल्याबद्दल हर्षदा राऊत, 10 वी मध्ये इंदापूर शहरात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर गायत्री संतोष आटोळे, व्याख्याते संजय सोनवणी यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.तर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या शीतल कांबळे यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
