स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर (दि . २९ / ६ / २० २४ ) :
इंदापूर तालुक्यामध्ये अनेक शिक्षण संस्था आहेत. या शिक्षण संस्था मधून हजारो मुले शिक्षण घेत आहेत. मात्र या सर्व गोष्टींना इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही शिक्षण संस्था अपवाद असून या संस्थेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील हजारो मुलांना अगदी परवडेल अशा शुल्कामध्ये शिक्षण दिले जाते. या शिक्षण संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी देश आणि जागतिक पातळीवरती नाव लौकिक मिळवले आहे. मात्र सध्या या शिक्षण संस्थेकडे काही संस्थेशी संबंध नसणाऱ्या राजकारण करणाऱ्या गाव पुढाऱ्यांची वाकडी नजर पडली असून या लोकांकडून शिक्षण संस्था बदनाम करण्याचे काम सुरू झाले असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या राजकारण्याची स्वतःची शिक्षण संस्था बंद पडेल अशा स्थितीत असताना. दुसऱ्या नावलौकिक शिक्षण संस्थेकडे वाकड्या नजर ने पाहणे म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखे आहे. त्यामुळे या गाव पुढाऱ्याने स्वतःचं झाकून ठेवून दुसऱ्याचं वाकून बघण्याचे काम करू नये अशी जनतेमध्ये चर्चा सुरू आहे.
इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही एक नावलौकिक शिक्षण संस्था आहे. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच या शिक्षण संस्थेचा शिक्षणाचा दर्जा अतिशय उत्तम असल्याने इंदापूर तालुक्यासह सोलापूर,सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. ही शिक्षा संस्था महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असलेली दर्जेदार शिक्षण देणारी संस्था आहे.
अलीकडच्या काळामध्ये या शिक्षण संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला असून या बदलामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील अनेक गावात हायस्कूल व महाविद्यालयांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. तर ही शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कारण या शिक्षण संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील मुले आनंदाने शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आसपासच्या खाजगी शिक्षण संस्था बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत.
हाच राग आणि द्वेष काही गाव पुढार्यांनी मनात ठेवून या चांगल्या शिक्षण संस्थेची बदनामी सुरू केल्याची चर्चा इंदापूर तालुक्यातील सामान्य लोकांमध्ये रंगली आहे. ज्या पुढाऱ्यांनी या संस्थेच्या विरोधात खोड्या करण्याचे काम चालू केले आहे. त्या पुढार्यांची शिक्षण संस्था सध्या अखेरची घटका मोजत आहे. तर संबंधित पुढाऱ्याच्या शिक्षण संस्थेतील डझनबरापेक्षा अधिक शिक्षकांनी वेळेवर पगार व व्यवस्थित वागणूक देत नसल्याने एकाच वेळी राम राम ठोकला आहे. तर संबंधित पुढाऱ्याच्या शिक्षण संस्थेतील हजारो मुले इंदापूर, अकलूज, बावडा या गावातील चांगल्या शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी गेली आहेत. त्यामुळे ही शिक्षण संस्था बंद पडते की काय अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
त्यामुळे मनात द्वेष आणि राग ठेवून संबंधित पुढाऱ्याने चांगली शिक्षण संस्था बंद पाडण्याचे कटकारस्थान केले तर इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनता येणाऱ्या काळात त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही. तसेच अगोदर अशा पुढार्यांनी आपली शिक्षण संस्था व्यवस्थित चालवून दाखवावी नंतरच इतर शिक्षण संस्थेकडे वाकड्या नजर ने पहावे, अन्यथा इंदापूर तालुका हा पुरोगामी विचाराचा असून अशा विकृत विचाराच्या लोकांना चांगला धडा शिकून कायम खड्यासारखे बाजूला करेल.
