
स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १५ / १ / २० २३]
: इंदापूर नगरपालिकेच्या नवीन इमारती ठिकाणी आ. दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्यावतीने ११० सफाई कर्मचाऱ्यांना मकर संक्रांतीनिमित्त गेल्या वर्षी प्रमाणे या ही वर्षी इंदापूर शहर स्वच्छ करीत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मकर संक्रांतीची रोख रक्कम पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे , शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे ,अक्षय भरणे, श्रीधर बाब्रस, वसंत माळुंजकर, हरिदास हराळे, गजानन पुंडे, मनोज भापकर यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
