
स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( १४ / १ / २० २३) :
कालठण नं. १ करेवाडी ते वरकुटे या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू असल्याची लेखी तक्रार उप कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर ता. इंदापूर जि.पुणे यांचे कडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विमुक्त जाती भटक्या जमाती सेल चे पुणे जिल्हा अध्यक्ष मा . आण्णासाहेब धोत्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे .

,
त्यांनी म्हटले आहे सदर वरील रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू असून सदर रस्त्याच्या बॉक्स रुंदीकरण व खडीकरण हे एकदम बोगस चालू असून खड़ी उघडी पडलेली आहे ती लेबरच्या साहयाने न करता जेसीबी मशीन व ट्रॅक्टरने खडी टाकून पाणी न मारता खड़ी वर मुरूम न टाकताच रोलींग न करता वरील बी.बी.एम. ची : तयारी करण्यास सुरुवात केली आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू असून सदर कामाची आपण स्वतः येऊन पहाणी करावी व सदर कामाच्या साईड बॉक्स एक मीटर नसुन एक फुट केलेले दिसून येत आहे.
त्यामुळे सदर कामाचे बील काढू नये काढल्यास आपण स्वतः व आपले डिव्हीजन याला जबाबदार राहील असे निवेदनात
म्हटले आहे .
माहिती साठी पत्र
१. सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता, पुणे
२) मा . मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
३) मा . सार्वजनीक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य
यांना पाठविण्यात आली आहे .
