1

स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे

इंदापूर तालुक्यातील  इंदापूर  पतंजली योगपरिवार कालठण पतंजली योग परिवार व शिवभक्त परिवार इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि . ७ जानेवारी रोजी कामधेनू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक डॉक्टर लक्ष्मण आसबे यांच्या नेतृत्वाखाली राजगड किल्ला चढायची मोहीम राबवण्यात आली त्याप्रमाणे ‘ कडाक्याची थंडी असून देखील रात्री३ वाजता इंदापूर व कालठण येथून १७५ स्त्री पुरुष साधक व छोटी मुले यांनी तीन लक्झरी बस द्वारे

राजगडला
 – भिगवण- बारामती – सासवड- कापूरहोळ येथे अल्पोपहार करून –
  नसरापुर  वेल्हा रोड ने मार्गासनी  नेरवने, लव्ही, वाजेघर,
पाली गावातून राजगड किल्ल्याच्या पायथ्याला खंडोबाचा माळ  येथे अरुंद अशा रस्त्याने सकाळी ९ वा ‘ गडाच्या पायथ्याशी पोहचून
खंडोबाच्या माळावर गाड़ी पार्किंग करुण डॉ. आसबे यांनी गडावर जाण्या करीता काही महत्त्वाच्या सुचना दिल्या त्या ठिकाणी इंदापूर पतंजली परिवाराच्या वतीने डाँ. आसबे चा फेटा शाल व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर सकाळी ९ वा . १५ मिनिटांनी गड चढाईला जय भवनी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजकीय छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा देत व हतात भगवे झेंडे घेऊन सुरुवात केली  यामध्ये ५ वर्षाच्या बालकापासून ने ८२ वर्षाच्या वृद्धांपर्यंत असणारे १७५ स्त्री पुरुष साधक एका बाजूला उंच  अवघड किल्ल्याचा डोंगर तर दुसऱ्या बाजुला खोल दरी अशा प्रकारेजंगलातील दगड धोंड्या च्या पाऊल वाटेने चालत गेल्यावर गडाच्या सदरेवरती ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणे दोन अडीच तासाची चढाई केल्या नंतर सदरेवरती पोहचले त्या ठिकाणी डॉ. आसबे सरानी गडाचा इतिहास व स्थळांबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती इतिहासाचे दाखले देत  असताना प्रत्येकामध्ये शौर्य व धाडस निर्माण करण्याचे काम त्यांनी केले . .
पुढे वरती गेल्यावर सुरुवातीला पद्मावती माची  तिथे महादेवाचे मंदिर, पद्मावती मंदिर, महाराणी सईबाइसाहेब समाधी, सदर, पाण्याचे तळे, टाक्या, चोर दरवाजा पाहून.
तेथुन पुढे वरती डाव्या बाजूने सुवेळा माची करून परत माघारी येऊन वरती बाले-किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाण छत्रपती सभाजी महाराज व मासाहेब जिजाऊ यांचे वास्तव्य होते त्या बालेकिल्ल्या वर जाऊन सर्वजन नतमस्तक झाले तसेच राजांच्या व माँ साहेबांच्या चरणाने पावन झाले ली माती आपल्या मस्तकाला
लावली व हरहर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ कि जय अशा घोषणां नी गड पुन्हा दणा नुन सोडला त्यानंतर बालेकिल्ला उतरून  परत सदरेवर येऊन सर्वानी झुणका भाकरीचा अस्वाद घेतला त्या नंतर
बालेकिल्ल्या वरूणच उजव्या बाजुची संजीवनी माची व पद्मावती माची करून सायंकाळी पाच वाजता पाली दरवाजा मधून गड उतार होण्यास सुसवात करून सायंकाळी साडेसा हा वाजता गड उतार हाल्यावर
आनंद व्यक्त करत सर्वांनी आनंदाच्या भरात घोषणा देत नृत्य केले त्यानंतर बसने इंदापूरकडे रात्री साडे सात वाजता  प्रवास दरम्यान जेजुरी येथे जेवन करून रात्री दीड वाजता इंदापूर येथे सर्वजण पोहचले .
– – – – – – – – – – – – – –
गेली १८ वर्षे इंदापूर येथे इंदापूर पतंजली योग परिवाराच्या वतीने दररोज पहाटे सव्वापाच ते सकाळी सात वाजेपर्यंत
इंदापूर पतंजली च्या मार्ग दर्शना खाली कालंठण नं .१ येथे तीन महिने झाले स्थायी योग वर्ग सुरु असून त्यास देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे .
योग साधनेबरोबर इंदापूर पतंजली योग परिवाराने
आपल्या शरीराची ताकद वाढावी तसेच महाराष्ट्रातील गडांचा इतिहास कळवा समजावा म्हणून तीन महिन्यांनी एका तरी गडावर जायचे असा उपक्रम सुरु केला असून इतिहासाचे अभ्यासक समाजसेवक डॉ. लक्ष्मणराव आसबे कामधेनू परिवार व शिवभक्त परिवार यांचे या उपक्रमास मोलाचे सहकार्य मिळताना दिसून येत आहे.