स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . १९ / १ / २०२४ ) :

इंदापूर शहरामध्ये कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेला वीरश्री मालोजीराजे भोसले चौकात इंदापूर बाह्यवळणावरील उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या चौकात कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करून वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे एक गोल घुमट बनवत शिल्प बनवले होते. ते शिल्प सध्या उध्वस्त करण्यात आले आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा शासनाचा चौक शुशोभिकरणाचा निधी पाण्यात गेला असून या सर्व गोष्टींना जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.?

राज्याचे तत्कालीन राज्यमंत्री आ. दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरात त्यावेळी चौक शुशोकरण व इतर कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्याचवेळी इंदापूर बाह्यवळणावरील चौकाला वीरश्री मालोजीराजे भोसले असे नाव देऊन त्या ठिकाणी वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे शिल्प बनवले होते. याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे व तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे नावे असलेला चौक हा इंदापूरकरांसोबत तमाम महाराष्ट्राचा अस्मितेचा प्रश्न आहे. आणि तोच महत्त्वाचा चौक बाह्यवळणाचे काम करत असलेल्या कंपनीने व काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने उध्वस्त केला आहे. कारण त्या ठिकाणी उड्डाण पुलाचे काम होणार हे माहिती असतानाही कोट्यावधी रुपयांचा निधी त्या चौकासाठी खर्च का केला असा प्रश्न उपस्थित होत आहे. नेमके कोणाच्या हितासाठी या चौक शोशोभीकरणाचा घाट घातला होता नंतर ते चौक उध्वस्त करण्यात आला या सर्व गोष्टींना जबाबदार कोण…? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

सदर प्रकाराबाबत इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता किशोर साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की काम होण्याअगोदरच NHAI ने जेव्हा आम्हाला गरज पडेल त्यावेळेस आम्ही सदरची जागा ताब्यात घेऊ असे म्हटले होते असे सांगितले आहे. परंतु अभियंता साळुंखे यांना आपणास माहिती असताना चौकशोभीकरणाचा घाट कशामुळे घातला असा उलट प्रश्न केला असता. त्यांनी सदर प्रकरणाबाबत घुमजाव करत मी पुणे येथे आहे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर बोलेल असे सांगितले आहे.

तसेच सदर उड्डाणपुलाचे काम करत असलेल्या कंपनीचे मॅनेजर मुकेश प्रजापती यांच्याशी संपर्क साधला असतात ते म्हणाले की याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. परंतु अधिकारी आणि ठेकेदार हे दोघेही अंग काढून बाजूला होत असतील तर नेमके याला जबाबदार कोण हे लोकप्रतिनिधींनी समोर येऊन सांगणे गरजेचे आहे.