जुन्या आणि या नव्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन गावचा विकास करावा ;आ दत्तात्रय भरणे :
स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १८ / १ / २० २३) :
इंदापूर तालुक्यात लोकसभा आणि विधानसभेचे वारे जोरदार वाहु लागले असून हर्षवर्धन पाटील यांची हक्काची ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या गंगावळण ग्रामपंचायच्या विद्यमान सरपंच निकिता प्रशांत गलांडे पाटील, उपसरपंच अभिजित विठ्ठल नलवडे, सदस्य रामहरी माणिक विपट, उज्वला रमेश जगताप, नंदा बाळासाहेब वाळुंजकर आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक प्रशांत गलांडे पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
या सोबतचं विठाबाई विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नितीन भारत पवार यांनी ही आमदार भरणे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना देखील हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, गंगावळण गावाचा पर्यटनात्मक विकास करण्यासाठी यापूर्वी आपण प्रचंड मदत केली आहे. आपल्याच माध्यमातून त्या ठिकाणी निधी आला आहे. जर कोणी त्यावरती दावा करत असेल विठाबाई देवी त्यांना बघून घे आणि मी खोटे बोलत असेल तर देवी मला बघून घेईल. भविष्यात देखील गंगावळणचा कायापालट करण्यासाठी आपण हवा तेवढा निधी देऊ. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाच्या) जुन्या आणि या नव्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन गावचा विकास करावा असे आवाहन भरणे यांनी केले.
