स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १२ / १ / २०२३ ) :

आज शुक्रवार दि . १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६:३५ वाजताच्या दरम्यान इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटामध्ये तुफान राडा झाला आहे. विशेष म्हणजे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या समोरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाले. त्यामुळे काही वेळ इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या उद्घाटनाच्या कोनशिलेवरती या भागाच्या खासदार . सुप्रिया सुळे यांचे नाव न टाकल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरद पवार गटाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. तात्काळ कोनशिलेवरती खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव टाका असा आग्रह करूनही शेवटी उद्घाटन झाले.

मात्र ,उद्घाटनाला आमदार दत्तात्रय भरणे स्वतः उपस्थित असताना दोन्ही गट अचानक समोरासमोर आले घोषणाबाजी चालू झाले तर एकमेकांमध्ये झटापट ही झाली. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. मात्र दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता पाहायला मिळाली.
यावरती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्या नी याचा निषेध करत घोषणा दिल्या खासदार सुप्रीया ताईचे नाव हेतुपुरस्कर न केल्याचा अरोप केला आहे.
तर दत्तात्रय भरणे यांनी आदरणीय खासदार सुप्रिया ताई सुळे व आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादांचे देखील नाव कोनशिलेवर टाकायचे गडबडीत राहून गेल्याचे म्हटले आहे तसेच ते टाकले जाईल असे ही ते म्हणाले .