ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर भूषण पुरस्काराचे वितरण सोहळा आणि वार्षिक सर्वसाधारण सभाचे आयोजन :
वार शनिवार दिनांक 30/12/2023 रोजी मीटिंगच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर यांनी प्रास्ताविक केले. सर्व पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमोद भंडारी यांनी गायनाचा कार्यक्रम केला. सूत्रसंचालन संस्थेचे सचिव हनुमंत शिंदे साहेब यांनी केले. यानंतर इंदापूर भूषण या कार्यक्रमास सुरुवात झाली पहिल्याप्रथम ज्येष्ठ लेखिका यांना पुरस्कार प्रदान करताना ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब घाडगे सर माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर, जाधव मॅडम , भानुदास पवार, खबाले महाराज, मनोहर चौधरी वकील, बंडू तात्या वाघ, संभाजी व्यवहारे, सुभाष दोशी, तुकाराम मोरे रघुनाथ खरवडे लेखक महादेव चव्हाण सर भारत बोराटे, गांधले सर पांडुरंग जगताप,अशोक गानबोटे यांच्या शुभहस्ते
श्रीमती प्रतिभाताई गारटकर नामवंत लेखिका यांना सन्मानपत्र देऊन इंदापूर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, दुसरा पुरस्कार मा. डॉक्टर लहू कदम बाल रोग तज्ञ यांना सामाजिक कार्याबद्दल इंदापूर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तिसरा पुरस्कार ज्येष्ठ नागरिक मुक्ताजी मोहन (बच्चू सेठ )कांबळे यांना धार्मिक कार्याबद्दल इंदापूर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .या पुरस्काराचे लेखन श्री सामसे सर यांनी केले त्यांचाही संघातर्फे सत्कार करण्यात आला.यानंतर पुरस्कार स्वीकारताना श्रीमती प्रतिभाताई गारटकर बाईंनी आपल्या संघाला रोख रुपये दहा हजार सदिच्छा देणगी दिली ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांचे मनापासून आभार.
यानंतर प्रत्येक महिन्याला संघातर्फे महिन्याचे वाढदिवस साजरे केले जातात या महिन्यांमध्ये असणारे वाढदिवस साजरे करण्यात आले.
यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेस सुरुवात झाली संस्थेचे सचिव हनुमंत शिंदे यांनी सभेपुढील विषय मांडले. सर्व सभासदांनी एक मुखाने सर्व विषय मंजूरी दिली. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा पार पडली. सुभाष महाजन सर अंकुश ढुके सिकंदर इनामदार, विश्वनाथ शिंदे, शिर्के दादा, श्रीमती सुनीता देशपांडे, अध्यक्ष उपाध्यक्ष,सर्व संचालक, सर्व सभासद हजर होते मीटिंग आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाली, त्यानंतर बाळासाहेबआबा पाटील यांनी सर्वांना स्नेहभोजन दिले.
