.
स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २६ / १२ / २० २३) :
महारष्ट्रतील इंदापूर तालुक्यातील उजनी धरणात विस्थापित झालेले ग्रामीण खेडे कालठण नं . १ असून गावाच्या तिन्ही बाजूने उजनी धरणाचे पाणी असून भारताचे दक्षीण टोक कन्याकुमारीची आठवण येते याच कालठण गावातील नागरीक विविध उपक्रम राबविण्यास अग्रेसर असतात अशीच एक संकल्पना येथील काही नागरिकांनी गेल्या १६ महिन्यापासून पतंजली योग समीती इंदापूर यांचे मार्ग दर्शना खाली कालठण पतंजली योग परिवार स्थापन करून दररोज पहाटे ५ ते सकाळी ६.३० वाजेपर्यंत १०० स्त्री पुरुष योग साधक अखंडपणे योग प्राणायम करत आहेत . त्यामुळेअनेक योग साधक साधिकांना विविध दुर्दर अजारातून मुक्ती मिळाली आहे.
या योग परिवाराच्यामाध्यमातून विविध सामाजिक धार्मिककार्यक्रम तसेच शिबिरे प्रवचन व्याख्याने अरोग्य मार्गदर्शने तसेच गड किल्ल्यांच्या सहली , गाय न हास्य विनोद , असे विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून रविवार दि . २४ / १२ / २०२३ रोजी पहाटे ४ वाजता किल्ले शिवनेरी, व अष्टविनायकापैकी रांजणगाव, ओझर लेण्याद्री,गणपती दर्शनअशा सहलीच्या आयोजन केले होते , यामध्ये १९ महिला व २६ पुरुष व ५मुले असे ५० योग साधक साधिका यांनी या सहलीत सहभागी होऊन मनसोक्त आनंद घेतला .
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय , राजमाता जिजाऊ माँ साहेब की जय , तुमच आमच नात काय .. जय जिजाऊ जय शिवराय अशा प्रकारच्या घोषणा देऊन किल्ल्याचा परिसर दणाणून सोडला .
यामध्ये किल्ल्याची संपुर्ण माहिती गाईडच्या माध्यमातून देण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ठिकाण त्या ठिकाणचे सात दरवाजे यांची माहिती पराक्रमी शहाजीराजे माँ साहेब जिजाऊ तसेच छत्रपती शिवराय यांच्या जन्माची कहाणी व इतिहास प्रत्यक्ष त्या जागी जाऊन त्या ठिकाणी जाऊन ऐकल्याने सर्वांमध्ये एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले यावर्षी योग परिवारच्या माध्यमातून किल्ला राजगड , किल्ला अजिंक्य तारा व कास पठार तसेच आता शिवनेरी सहलीचे आयोजन त्या ठिकाणच्या इतिहासातील आठवणींना उजाळा देत पायी जाऊन येणे केल्या ने शरीराची ताकत मनाची देखील शुद्ध होत असल्याचा अनुभव येत आहे.
अशा प्रकारच्या गड किल्ल्यांच्या सहलीच्या माध्यमातून सामूहिक ऊर्जा निर्माण होते त्यामुळेच गड किल्ल्यांची सहलीचे आयोजन ही संकल्पना राबविली जात आहे .
या सहली करीता योग मार्गदर्शक भागवत भाऊ गटकुळ , काकासाहेब मांढरे , दाऊत मुलाणी , विकास सावंत, भारत शेडगे सर ,भास्कर जगताप , सचिन जाधव ,दत्तात्रय मदने , विष्णु जावळे , संपत जगताप , अविनाश जगताप , विठ्ठल पाडुळे , व महिला योग साधिका सौ. अमिता पाडुळे , राबिया पठाण , आशा पाडुळे, पल्लवी जाधव, कल्पना जगताप , सुंदर शेंडगे , माधुरी मदने , सुनिता जगताप यांनी सहल यशस्वी करण्या करिता परिश्रम घेतले .
यामध्ये ७ ० ते ७५ वयाचे जेष्ठ योग साधक पोपट कोळेकर , रमेश जाधव , चांगदेव गटकुळ , व चित्रपट अभिनेते भिमसेन चव्हाण , तसेच योग साधिका श्रीमती कोंदण पठाण , गयाबाई गटकुळ , बकुळा जावळे , लताबाई गटकुळ यांनीही न थकता शिवनेरी किल्ली व लेण्याद्री गणपती चढाई उतराई केली .
