स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २६ / १२ / २०२३ ):

देशातील लोकसभेचं मतदान अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलं असतानाच सोमवारी (दि.२५ डिसेंबर) रोजी महा संसदरत्न खा. सुप्रिया सुळेंनी इंदापूर तालुका भेटीगाठीच्या निमित्ताने पिंजून काढला त्यानंतर सायंकाळी. इंदापूरात शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये दिवसभराचे विश्लेषण, केंद्र सरकारने संसदेत खा. सुळेंचं केलेलं निलंबन, कांदा निर्या प्रश्न, संसदेवर झालेला हल्ला, दूध दरवाढीचा प्रश्न इथेनॉल निर्मितीसह लोकसभेत सादर केलेली नागरिकांसह पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याव गदा आणणारी विधेयके यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली .
यावेळी खा. सुळेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली यामध्ये एका पत्रकाराने “माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी जवळीक वाढली आहे काय?” असा प्रश्न विचारताच खा. सुळेंनी हजरजबाबीपण दाखवत “आमच्यातली जवळीक कधी संपलीच नव्हती.” असं ठामपणे सांगत पवार – पाटील कुटुंबांची जवळीक कै. खा. शंकरराव पाटील यांच्यापासून ते आजपर्यंत अबाधित असल्याचे सांगितले. नाही.
.
शेजारीच बसलेल्या पुणे जिल्हा परिषदेच माजी सभापती आणि सदस्य प्रविण भैय्या माने राष्ट्रवादीतील फुटीनंतर जास्त सक्रीय दिसून आल्याचे दिसत आहेत .
आगोदर लोकसभा आणि नंतर विधानसभा हे समीकरणानुसार सुप्रिया सुळे यांच्यापुढे सध्यातरी लोकसभेच्या रणनिती आखण्याशिवाय दुसरा पर्याय नाही मात्र यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे हे खा.सुळेंविरोधात काम करतील हे सांगायला कोण्या जोतिष्याची गरज नाही.
या लढाईत सध्यातरी खा. सुळे यांच्याकडे प्रविण भैय्या वगळता पहिल्या फळीतला अन दांडगा जनसंपर्क असलेला नेता दुसरा कोणीही नाही. आणि यामुळेच प्रविण भैय्यांना विधानसभेची शाश्वती देऊन लोकसभा पदरात पाडून घेणंच खा. सुळेंना सोप्पं जाईल यात तिळमात्रही शंका नाही. आणि यामुळेच भैय्यांची कळी खुलली होती की काय असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. एवढंच काय ते…
यावेळी तालुका अध्यक्ष अॅड तेजसिंह पाटील , कार्याध्यक्ष महारुद्र पाटील , जेष्ठ नेते अशोक घोगरे , किसनराव जावळे तसेच राष्टवादी चे अनेक पदाधिकारी उपस्थीत होते,
या प्रसंगी कालठण गावचे सुपुत्र डॉ. अनिकेत बापूसाहेब जगताप मेडीकल मध्ये झालेल्या परिक्षेत देशात ४ थ्या नंबरने उत्तीर्ण झाले बद्दल नवी दिल्ली येथील एम्स हॉस्पीटल येथे नियुक्ती झाले बद्दल त्यांचा फेटा ,शाल व पुष्पगुच्छ देऊन खा सुळेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
